*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, युनेस्कोच्या कल्चरल विभाग व भारत सरकार यांच्या विद्यमाने 13 वे कल्चरल डान्स ऑलिपॅड पॕरीस, फ्रान्स येथे कु. समृद्धी दत्तात्रय यादव हिने इथेनिक सोलो या डान्स प्रकारांमध्ये दुसरा क्रमांक (सिल्वर मेडल) मिळविलाआहे..
एबी. एस. एस. च्या चेअरपर्सन रत्ना वाघ, हेमंत वाघ तसेच युनेस्कोच्या कल्चरल कमिटीचे चिप जुडेत व्हॅन झडेन यांच्या हस्ते तिला सिल्वर मेडल देऊन गौरविण्यात आले. तिच्या या यशाबद्दल आमदार महेश दादा लांडगे, सारिकाताई पवार, कविता हिंगे, अजय पताडे, पंकज निकम व पिंपरी चिंचवड करांनी तिचे अभिनंदन केले.
कु. समृद्धी सध्या DR. BHANUBEN NANAVATI COLLEGE OF ARCHITECTURE, पुणे. येथे वास्तुशास्त्र विभागात चौथ्या वर्षात शिकत आहे. सन 2010 पासून समृद्धी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर सहा वेळा भाग घेऊन गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉझ मेडल जिंकली आहेत. थायलंड, मलेशिया, दुबई, सिंगापूर, मॉरीसिस अशा विविध देशांमध्ये तिने आपली नृत्य कला सादर केली आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलन, अखिल भारतीय नाट्य संमेलन, पुणे फेस्टिवल, दम दमा दम, इंद्रा या सिनेमांमध्ये विविध ठिकाणी तिने नृत्य कला सादर केली आहे. सन 2017 मध्ये तिला राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट नृत्यकलाकार म्हणून शरद पवार साहेब यांच्या हस्ते गौरवण्यात आले होते. आत्तापर्यंत समृद्धीने 200 पेक्षा जास्त ट्रॉफी, मेडल व सर्टिफिकेट मिळवली आहेत.समृद्धी चे वडील दत्तात्रय यादव हे मुळचे बिजवडी अकलूजचे रहिवासी असुन तिच्या या यशामध्ये तिचे आईवडील यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले असुन सर्वच तिचे कौतुक होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा