*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते वक्तव्य आता त्यांना भोवलं आहे. संजय गायकवाड यांच्यावर भारतीय न्याय संहिता नुसार 192, 351 (२) , ३५२ (३), ३५२ ( ४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
गुन्हा दाखल झाल्यावर संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया
“आम्ही गुन्ह्याची परवा कधी केली नाही. आरक्षणाला विरोध करणाऱ्याला धडा शिकवण्याकरता गुन्हा दाखल होत असेल तर आम्हाला काही अडचण नाही. याला जर गुंडगिरी म्हणता असतील तर ही गुंडगिरी मला मान्य आहे”, अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली आहे.
काय म्हणाले होते संजय गायकवाड ?
जो राहुल गांधीची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस देणार आहे. राहुल गांधी यांना मागासवर्गीय, आदिवासींसह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचं आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करून त्यांच्या मनातील ओठावर आलं आहे. राहुल गांधी हे जे शब्द बोलले की, आम्हाला आरक्षण संपवायचंय. माझं आवाहन आहे की, जो राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस मी माझ्या वतीनं देईल असे संजय गायकवाड म्हणाले होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा