Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४

*महात्मा फुले पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न* *पतसंस्थेकडून सभासदांना १५ टक्के लाभांश* *कोअर बँकिंग सुविधा देणार-- राजेंद्र गिरमे*


 

*उपसंपादक --नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

महात्मा.फुले पतसंस्थेने ठेवी स्वीकारणे बंद केले तरी पतसंस्था स्वभांडवलावर कर्ज वाटप करू शकते आणि चांगला नफा मिळवून सभासदांना पुढील काळात सुद्धा कायमस्वरूपी १५ टक्के लाभांश देऊ शकते एव्हढी आपली पतसंस्था आर्थिकदृष्ट्या भक्कम झाली आहे.पतसंस्था सभासदांना १५ टक्के लाभांश देणार असून संस्थेच्या वतीने कोअर बँकिंग सुविधा सुरू करीत असल्याचे माळीनगर येथील म.फुले पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांनी येथे बोलताना जाहीर केले. 



    येथील म.फुले ग्रा.बिगरशेती सहकारी पत संस्थेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.१५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सौभाग्य मंगल कार्यालय माळीनगर येथे आयोजित करण्यात आली होती,याप्रसंगी श्री.गिरमे बोलत होते.सभा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.प्रारंभी क्रांतीसुर्य म.फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सभासद विजय नेवसे  यांचे हस्ते करण्यात आले.



       यावेळी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन महादेव एकतपुरे,संचालक किरण गिरमे,निळकंठ भोंगळे,अंकुश फुले,चंद्रकांत जगताप,जयवंत चौरे,सुरज वाघमोडे,कृष्णा भजनावळे,सासवड माळी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन निखिल कुदळे,संचालक राहुल गिरमे,म.फुले दूध डेअरीचे संस्थापक सेक्रेटरी मिलिंद गिरमे,शुगरकेन सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे,संचालक सुरेश राऊत,सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अजय गिरमे,संचालक दिलीप इनामके,कारखान्याचे इंडिपेंडंट डायरेक्टर राजीव देवकर,दि मॉडेल हायस्कुलचे उपप्राचार्य रितेश पांढरे,सभासद अनिल गिरमे,नागनाथ बधे,महादेव बंडगर,आदी सभासद उपस्थित होते.

        यावेळी पतसंस्थेचे सेक्रेटरी योगेश कचरे यांनी अहवाल व  ताळेबंदाचे वाचन केले.यामध्ये पतसंस्थेची स्थापना १९९४ साली झाली असून सभासद ५२४ एव्हडे आहेत.संस्थेचे भाग भांडवल ९९ लाख  ४५ हजार एवढे आहे. संस्थेत १८ कोटी ३८ लाख  रुपये ठेवी असून खेळते भांडवल ३२ कोटी ३ लाख आहे.संस्थेची वार्षिक उलाढाल १३८ कोटी ८९ लाख असून कर्ज वसुली ९२.४२ टक्के एवढी आहे. संस्थेचा तरतूदपूर्व नफा २ कोटी १ लाख व निव्वळ नफा ६८ लाख ६९ हजार एवढा असून संस्थेला 'अ' ऑडिट वर्ग मिळाला असल्याचे सांगितले.

         श्री.गिरमे म्हणाले,एखादी संस्था काढणे सोपे असते परंतु ती संस्था चालवणे आणि टिकवणे खूप अवघड असते.पण आपण आपली पतसंस्था चालवताना गेली ३१ वर्ष संस्थेचा कारभार पारदर्शक व काटकसरीने केल्यामुळेच संस्था चांगली नफ्यात राहिल्याने मोठी होत चालली आहे.महिला बचत गट स्थापन करून महिलांना गृह उद्योगासाठी कर्जवाटप करून महिलांना रोजगार निर्मितीसाठी पतसंस्था प्रयत्न करणार आहे. सामाजिक दृष्ट्या विचार करून समाजातील अनेक लोकांना व्यवसायासाठी,दवाखान्यासाठी तसेच शालेय शिक्षणासाठी गरजूंना गणवेश,शै.साहित्य, वह्या,पुस्तके याकरिता पतसंस्था आर्थिक मदत करीत असल्याचेही श्री.गिरमे म्हणाले.

          यावेळी सभासदांनी अहवाल व ताळेबंदावर विचारलेल्या प्रश्नांना संस्थेचे चेअरमन राजेंद्र गिरमे व सेक्रेटरी योगेश कचरे यांनी समाधानकारक उत्तरे दिली. 

     सभा यशस्वी करण्यासाठी सेक्रेटरी योगेश कचरे,हमीद कोरबू,ज्ञानेश्वर व्यवहारे,युवराज कापले,यश एकतपुरे,सनी भुजबळ,सूरज घोगरे,शिवाजी कुदळे,योगेश म्हेत्रे,सागर गिरमे,अन्वर काझी यांनी परिश्रम घेतले.संचालक सूरज वाघमोडे यांनी स्वागत केले तर शेवटी व्हा.चेअरमन महादेव एकतपुरे यांनी आभार मानले.


फोटो ओळी-

माळीनगर येथील म.फुले पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी क्रांतिसूर्य म.फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पूजनावेळी विजय नेवसे,राजेंद्र गिरमे,महादेव एकतपुरे,किरण गिरमे,निळकंठ भोंगळे,अंकुश फुले,चंद्रकांत जगताप,जयवंत चौरे,सुरज वाघमोडे,कृष्णा भजनावळे दिसत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा