*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
२५४-माळशिरस विधानसभा निवडणूक 2024 माळशिरस 254 विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार उत्तमराव जानकर यांची उमेदवारी(नामनिर्देशन पत्र) सोमवार दि.२८ ऑक्टोंबर २०२४ रोजी संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील जनतेने सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता विजय चौक अकलूज येथे उपस्थित रहावे असे आवाहन केले असून विजय चौक येथे सभा होणार आहे या अनुषंगाने संपूर्ण माळशिरस विधानसभा मतदारसंघात गावभेट दौऱ्याचे आयोजन,२५४-माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार . उत्तमराव जानकर ,युवानेते अर्जुनसिंह मोहिते-पाटील(माजी उपसभापती पंचायत समिती माळशिरस) व माळशिरस तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्वपक्षीय मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले त्या अनुषंगाने आज दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी. पिसेवाडी निमगाव किलो गारवाड चांदापुरी पठाण वस्ती. झिजेवस्ती कुसमोड काळमवाडी साळमुख फळवणी कोळेगाव शिंगोर्णी बचेरी सुळेवाडी पिलीव तांदुळवाडी शेंडे चिंच इत्यादी ठिकाणी गाव भेट दौरा संपन्न झाला याप्रसंगी प्रमुख मान्यवर- पदाधिकारी यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले व गावाच्या संदर्भात असणाऱ्या समस्या जाणून घेतल्या.
याप्रसंगी सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य-, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष -काँग्रेस आय- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शेतकरी कामगार पक्ष व मित्र पक्ष आदी महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय मान्यवर पदाधिकारी, नागरिक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा