Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

*सकारात्मक विचार हाच आनंदी जगण्याचा खरा मूलमंत्र आहे-- जयसिंह मोहिते पाटील* *वयाच्या ७५ व्या वर्षी बाळदादांनी आपल्या उत्साही व आनंदी जीवनाचे गुपीत राज सांगितले*

 


*अकलुज ------प्रतिनिधी*

  *केदार लोहकरे*

    *टाइम्स 45 न्युज मराठी

जीवनात सकारात्मक विचार केला तर माणसांना नवीन जीवन जगण्याची उर्जा मिळते.असे उद्गगार जयसिंह मोहिते-पाटील यांनी काल सुमित्रा पतसंस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना विचार व्यक्त केले.

        ते पुढे म्हणाले की,माणूस सकारात्मक विचारांमुळे आयुष्यभर माणूस आनंदी रहातो हाच सुखी व आनंदी जीवन जगण्याचा खरा मूलमंत्र आहे.त्यामुळे दररोज नवीन वेगळे कार्य करण्याची शक्ती व प्रेरणा मिळते.यातूनच सर्वांना सुख व समाधान आहे.प्रत्येकांनी आपल्यातील नकारात्मक विचार न करता सदैव सकारात्मक चांगले विचार अमलात आणले तर जीवन सुखकारक होऊन जाईल.माझ्या जीवनाच्या प्रवासात मी सदैव चांगलेच कार्य करत राहिल्यामुळे आज मी वयाच्या ७५ व्या वर्षीही सतत उत्साही व आनंदी राहिलो आहे. त्यामुळे लोकांसाठी नवीन काहीतरी करण्याची मला प्रेरणा व शक्ती मिळत आहे.

           यावेळी सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन महादेव अंधारे,दिपक खराडे-पाटील, सुभाष दळवी,अशोक जावळे, विजय शिंदे,नारायण फुले, विलास भरते,विशाल फुले, अभिजीत रणवरे आदी उपस्थित होते.



*चौकट*

दूरदृष्टी नेते बाळदादा यांच्यामुळे गोरगरीबांपासून सर्वसामान्य लोकांचे कल्याण व प्रगती झाली आहे.सर्वांची स्वप्न सत्यात उतरली आहेत.त्याच्यामुळे आज सर्वसामान्य कार्यकर्ता ग्रामपंचायतीचा सदस्य,सरपंच, पंचायत समितीचे सदस्य, सभापती,जिल्हा परिषदेचे सदस्य,आमदार,खासदार,सहकारी संस्थेचे संचालक झालेले आहेत.


       महादेव अंधारे

चेअरमन सुमित्रा पतसंस्था,   

          अकलूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा