*विशेष ----प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो--शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित कृष्णानंद विद्यामंदिर पाटील वस्ती या विद्यालयाने तालुका सर्व जिल्हा स्तर कुस्ती स्पर्धेमध्ये भरघोस यश संपादन केले. या विद्यालयातील विद्यार्थी पृथ्वीराज श्यामा चव्हाण या विद्यार्थ्याने ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाळी तालुका क्रीडा स्पर्धेमध्ये माळशिरस या ठिकाणी पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत 19 वर्षे वयोगट व 65 किलो वजनी गटात तालुक्यामधून प्रथम येण्याचा मान पटकावला. तसेच 28 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत 19 वर्षे वयोगटात व 65 किलो वजनी गटात प्रथम येण्याचा मान पटकावला. व त्याची निवड भाळवणी तालुका पारनेर जिल्हा नगर या ठिकाणी होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. त्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. संस्थेचे मार्गदर्शक संचालक जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका.कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे स्थानिक व्यवस्थापन समितीचे सभापती सर्व सदस्य, मुख्याध्यापक, व सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी त्याचे अभिनंदन व कौतुक केले. 837 451*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा