*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
----विदेशात शिक्षण घेऊन त्याचे सादरीकरण सर्वसामान्यात करण्याऐवजी विस वर्षातील मंत्रीपदाच्या कार्यकाळात मिळालेल्या मलिदा खावून आमदार भरणे मामांवर टिका करण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल माजी सभापती प्रशांत पाटील यांनी अंकिता पाटील ठाकरे यांचे नाव न घेता केला.
नरसिंहपूर (ता.इंदापूर) येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून करण्यात आला. त्यावेळी प्रशांत पाटील बोलत होते. यावेळी हनुमंत कोकाटे, श्रीमंत ढोले, दत्तात्रय घोगरे, महादेव घाडगे, उस्मान शेख, आण्णासाहेब कोकाटे, संग्रामसिंह पाटील, अर्चना नितीन सरवदे, श्रीकांत दंडवते, श्रीकांत बोडके, दादासाहेब क्षिरसागर, पांडुरंग डिसले, सोमनाथ मोहिते, नवनाथ रूपनवर, सुरेश शिंदे, नरहरी काळे, शितल कांबळे, विठ्ठल देशमुख, दशरथ राऊत, अरूण क्षिरसागर, धैर्यशील पाटील, जालिंदर गायकवाड, संगिता दंडवते, अर्चना कोळी, संगिता धोत्रे, अनघा कोळी, दत्तात्रय कोळी, दत्तात्रय घोगरे आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रशांत पाटील पुढे म्हणाले, समाजकारण राजकारणात सर्वांना घेऊन जाणारे व सर्व जाती धर्मांना समानतेची वागणूक देणारे आमदार दत्तात्रय भरणे यांचे नेतृत्व आहे. मागील विस वर्षात मंत्री पदाच्या काळात राहिलेला तालुक्याचा बॅकलॉग भरणे मामांनी सहा हजार कोटींचा निधी आणून पुर्ण केला आहे.
तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे म्हणाले, अंकिता पाटील यांनी आपली उंची बघूनच टिका करावी. भरणे मामांवर बोलण्यापेक्षा आमच्यावर काय टिका करायची ती करावी त्यास प्रतिउत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. यापुढे जर भरणे मामांवर बोललात तर जशास तसे उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.
माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले म्हणाले इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करणारे एकमेव नेतृत्व आमदार दत्तात्रय भरणे आहेत. त्यांनी कोणतेही जात धर्म पंथ याचा विचार न करता फक्त विकासच केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करताना विरोधकांनी तोंडआवरावे अन्यथा जशास तसे उत्तर देण्यात येईल.
बावडा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच धैर्यशील पाटील म्हणाले, राजकारणात मागील तीस वर्षापासून असतानाही आम्हाला आमची ओळख अजूनही सांगावी लागते ही फार मोठी शोकांतिका आहे. हर्षवर्धन पाटील माझे नात्याने चुलते असूनही त्यांचे आमचे राजकीय वैरत्व आहे. बावडा ग्रामपंचायतचा कारभार रामभरोसे चालला असून माहिती अधिकारात मागितलेली माहिती खाल्लेला मलिदा बाहेर पडेल म्हणून देऊ शकत नाहीत.
श्रीकांत दंडवते म्हणाले भरणे मामा यांच्यामुळे तीर्थक्षेत्र नीरा नरसिंहपूरचा कायापालट झाला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून २८० कोटीचा निधी देण्यात आला आहे. भक्तनिवास दोन्ही नद्या वरील पूल अंतर्गत काँक्रिटीकरण आधी कामे उत्कृष्टरित्या पूर्ण करण्यात आली आहेत.
यावेळी नितीन सरवदे, उस्मान शेख, दशरथ राऊत आदिंची भाषणे झाली.
भरणे मामा यांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केल्यानंतर टनु गिरवी पिंपरी बुद्रुक गोंदी लुमेवाडी सराटी आदी गावात घोंगडी बैठका घेऊन मतदारांना २५ तारखेला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजर रहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
फोटो - नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात दत्तात्रय भरणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करताना.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा