Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २० ऑक्टोबर, २०२४

*कोडोलीच्या यशवंत शिक्षण शास्त्र महाविद्यालयात तरंगचित्र स्पर्धेत "स्वाती पाटील" प्रथम*

 


*प्रा-विश्वनाथ पाटील*

      *कोडोली-- कोल्हापूर*

    *टाइम्स 45 न्यूज मराठी

कोडोली ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ललित कला विभागाच्यावतीने रविवारी घेण्यात आलेल्या तरंगचित्र स्पर्धेत स्वाती पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांकाच्या मानकरी भाग्यश्री विनायक पवार ठरल्या. धनश्री पोपट पाटील आणि प्राजक्ता प्रभाकर घोसाळकर या अनुक्रमे तिसऱ्या व उत्तेजनार्थ क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.


    बिजेत्यांसह सर्व सहभागी स्पर्धकांचे श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी डॉ. जयंत पाटील , अध्यक्षा पद्मजादेवी पाटील आणि विश्वस्त विनिता पाटील यांनी अभिनंदन केले. हस्तकला कारागीर संघटनेचे पन्हाळा तालुका सचिव विजय कोपार्डे, चित्रकार व अभियंत्या आकांक्षा कोपार्डे आणि प्रा. प्रकाश बुगले यांनी परीक्षण केले.


   प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षकांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.. विजय कोपार्डे व प्राचार्य डॉ. पाटील यांनी स्पर्धकांचा गुणगौरव करणारी भाषणे केली.


    संजय मोहिते यांनी प्रास्तविक केले. शिल्पाताई लक्ष्मण पाटील आणि प्रा. संजय जाधव यांनी सूत्रसंचलन केले. विश्वजीत राजन खोत यांनी आभारप्रदर्शन केले. ललित कला विभागाचे प्रमुख प्रा. प्रदीप पाटील आणि ग्रंथपाल विशाल सर्जेराव शेवाळे यांनी स्पर्धेचे संयोजन केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी कार्यालीन अधीक्षक एस. के. पाटील, वरिष्ठ लिपिक अनिल इंदुलकर आणि सेवक तानाजी मोहिते यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा