*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
आरळी( दह्याची) ता. अक्कलकोट जि.सोलापूर येथील 'मकबूल शेख' यांची सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र नुकतेच राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकरराव म्हेत्रे यांच्या हस्ते देण्यात आले
मकबुल शेख यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तालुकास्तरावर सामाजिक, शैक्षणिक क्रीडा, आणि राजकीय क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याने त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांची सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली असल्याचे टाइम्स 45 न्यूज मराठी शी बोलताना म्हणाले ते पुढे म्हणाले की
काँग्रेस पक्षाचे विचार, ध्येय, धोरणे, शिस्त, सहकार्य व स्वावलंबन या प्रेरणेतून सर्व धर्म स्वभाव, समता व बंधूता यातून राष्ट्रीय ऐक्य निर्माण करण्यासाठी कार्य करणार असून व काँग्रेस पक्ष अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मा. श्रीमती सोनियाजी गांधी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे राहूल गांधी, इम्रान प्रताप गढी, खासदार- प्रणितीताई शिंदे, प्रदेश अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष बळकटी साठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा