Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३० ऑक्टोबर, २०२४

*यंदाच्या दिवाळीवर महागाईचे सावट ---स्थानिक बाजारपेठेपेक्षा ऑनलाईन खरेदी कडे कल?*


 

*विशेष--- प्रतिनिधी*

   *एहसान----मुलाणी*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*

  ,*मो:-9096837451*

दिवाळी सणावर महागाईमुळे मंदीचे सावट असल्याने खरेदीचा उत्साह दिसत नाही. तर तरुणाईचा ओढा ऑनलाईन खरेदीकडे आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेमध्ये सणासुदीच्या दिवसातही शुकशुकाट दिसून येत आहे. काही फटाके विक्रेत्यांनी सांगितले की, दिवाळीत फटाक्यांना पुरेशी मागणी नाही. दरही दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे पूर्वी सारखी विक्री होईल असे वाटत नाही. कपडे खरेदी, सोने, वाहने खरेदीसाठीदेखील गर्दी दिसून येत नाही. भाजीपाला, मासळी, पेट्रोल, डिझेल आणि रोजच्या जीवनातील वस्तूंचे भाव आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्य जनता हवालदिल आहे, असे ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे.


आर्थिक मंदीमुळे बहुतेक बाजारपेठ थंडावली असून दिवाळीत उलाढाल फारशी होईल, असे चित्र नाही. नेमक्याच दुकानातून ग्राहक खरेदीसाठी आलेले दिसून येत आहेत. काही फटाके विक्रेत्यांनी सांगितले की महागाईमुळे फटाके विक्री घटली आहे. मंदी ओळखून आम्ही यंदा ७५ टक्केच फटाके विक्रीस आणले आहेत. महागाईमुळे राज्यातील जनता त्रस्त आणि हैराण झाली आहे. जीवनावश्यक वस्तूच घेण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने फटाके खरेदीसाठी येणारे ग्राहक अगदीच कमी प्रमाणात येत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा