Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३० ऑक्टोबर, २०२४

*विमा प्रतिनिधी संघटनेच्या अध्यक्षपदी" रामचंद्र आसबे" यांची निवड*

 


*विशेष ---- प्रतिनिधी*

  *राज ----मुलाणी*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*

  *मो.840881733

एलआयसी विमा-प्रतिनिधी संघटनेच्या अध्यक्षपदी रामचंद्र आसबे यांची एकमताने निवड करण्यात आली. भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा पंढरपूर 94 सी अंतर्गत असणारी एस एस ओ शाखा अकलूज येथील सर्व विमा प्रतिनिधी यांची सहविचार बैठक संग्रामनगर-अकलूज येथे पार पडली. या सभेत गणेश रणनवरे यांनी सभेचे अध्यक्ष म्हणून रामचंद्र आसबे सर यांची निवड केली. व दत्तूसिंग भैस यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर गणेशाच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे एम .एम. शेख,. धनंजय शिंदे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. दादासाहेब भोसले यांनी नूतन अध्यक्ष यांचा सन्मान केला. त्यानंतर दत्तुसिंग भैस, श्री. यादव , बंडगर ,श्री. पांढरे , मोहन मोरे यांनी एलआयसीच्या चालू घडामोडी वर आपली मनोगते व्यक्त केली व त्यानंतर अध्यक्षीय भाषणात आसबे सर यांनी संघटनेचे महत्त्व व त्याचे फायदे यांची माहिती विशद केली. त्याच बरोबर सभासद होणे का आवश्यक आहे .याची सविस्तर माहिती सांगितली .तसेच लियाफी सभासद होणे का आवश्यक आहे? व एजंट सोसायटी चे सभासद होणे किती महत्त्वाचे आहे यांचीही जाणीव करून दिली .महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण देशभर सुरू असणारे प्रतिनिधींचे आंदोलन त्यात आपला सर्वांचा सहभाग हे भविष्याच्या दृष्टीने का आवश्यक आहे,त्याची जाणीव करून दिली .त्याप्रसंगी एम.रफीक शेख , शिंदे- पाटील हेही व्यासपीठावर उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर ननवरे यांनी केले, तर आभार मोहन मोरे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा