उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज चॅनल
*
नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोक साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक, संशोधक व समीक्षक असलेल्या डॉ. तारा भवाळकर यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्यानिमित्ताने ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने सांगली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ आणि ग्रंथ भेट देऊन त्यांचे अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला. ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेतर्फे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नसीम जमादार आणि सांगली जिल्हाध्यक्ष मुबारक उमराणी हे उपस्थित होते.
याप्रसंगी डाॅ.तारा भवाळकर यांनी संस्थेच्या वाटचालीची, प्रगतीची माहिती घेतली आणि संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.यापुढील काळात नवनवीन साहित्यिकांनी दर्जेदार साहित्याचे लेखन केले पाहिजे तसेच समाजातील वास्तव परिस्थिती आणि स्त्रियांचे प्रश्न याविषयीचे परिपूर्ण लेखन झाले पाहिजे असे मत या प्रसंगी त्यांनी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा