Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०२४

समाजकारण राजकारणात कर्मचारी, सर्वसामान्य गोरगरिबांना त्रास देणाऱ्यांना खड्या सारखे बाजूला काढा - इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत बापू पाटील


 

*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी 

टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  8378081147*

----- समाजकारण राजकारणात कर्मचारी, सर्वसामान्य गोरगरिबांना जर कोणी जाणून बुजून त्रास देत असेल तर आता योग्य वेळ आली आहे त्याला खड्या सारखे बाजूला काढा असे आवाहन पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत बापू पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केले.

    गणेशवाडी येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरात महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्रीमंत ढोले, हनुमंत कोकाटे, दत्तामामा घोगरे, श्रीकांत बोडके, सुरेश शिंदे, शितल कांबळे, निलेश घोगरे, जालिंदर गायकवाड, राहुल बागल, उमेश शिंदे, सागर खंडागळे, विद्यासागर घोगरे, दत्तात्रय घोगरे, अलका खंडागळे, लतीका कांबळे, गिरीजाबाई खंडागळे, मंगल खंडागळे आदि मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.



       प्रशांत बापू पाटील पुढे म्हणाले, आपल्याला प्रत्येक गोष्टीत न्याय मिळवायचा असेल तर अशा नितीभ्रष्ट व कर्तव्य कसूर माणसाला बाजूला सारण्यासाठी महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान घडवून विजयी करावे. तालुक्याचा आमदार आपल्या विचारांचा असला तर जे पाहिजे ते काम करता येते. शंकर भाऊंच्या मुलीलाही बाजूला सारून कसले राजकारण करताय. शंकर भाऊंच्या निधनाबरोबर त्यांच्या आचार विचारांना तिलांजली देण्याचे काम केले आहे. तालुक्यातील सर्व संस्थांची पदे स्वताच्या घरातच घेता कुठे फेडणार आहात हे पाप याचे उत्तर द्या. लोकशाहीत घराणेशाहीला जनता महत्त्व देत नाही. पदे लोकांची कामे करण्यासाठी असतात त्यांना त्रास देण्यासाठी नाही.



     माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले म्हणाले, एकीकडे स्वताच्या स्वार्थासाठी पक्ष बदलणारे आहेत तर दुसरीकडे तालुक्याचा विकास कामातून चेहरा बदलणारे नेतृत्व भरणे मामा आहेत. पाच वर्षात सहा हजार कोटींचा निधी आणला त्यातील एक हजार कोटींच्या जवळपास निधी बावडा भागातील कामासाठी दिलेला आहे. बावड्यासारख्या गावावर सत्ता असताना यांना विकास करता आला नाही. स्मशानभूमी, अंगणवाडी शाळा व रस्त्याचे काम केले नसतानाही लाखो रूपये काढून खाल्ले हा यांचा विकास आहे. बावड्यासारख्या गावातील नागरिकांच्या नावाने पैसे काढून खाल्ले तर तालुक्यातील नागरीकांच्या बाबत काय करतील याची कल्पना न केलेलीच बरी आहे. गावातीलच लोकांवर अन्याय अत्याचार होत असेल तर तालुक्यातील लोकांचे काय? मग आपण यांना निवडून देणार का?

      तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे म्हणाले, उमेदवारांच्या ताब्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या दवाखाना खर्चातील दोन लाख ६० हजार रुपयांत एक लाख दहा हजार रूपये खात असतील तर तालुक्याचा कारभार अशा पध्दतीने करतील याची कल्पना न केलेली बरी. महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना निवडून द्या तुमची गणेशवाडी गावची ग्रामपंचायत स्वतंत्र करून देण्याचे काम करण्यात येईल. पाटीलकीच्या थाटात गोरगरीबांचे रक्त पिण्याचे काम करणारे आम्हाला मलिदा गॅग म्हणून हिणवतात. भरणे मामा गाडी व माडीतच जन्माला आले असून तुमची १९९५ पुर्वीची काय परस्थिती होती. राॅकेलच्या गाडीवर फिरत असणारे तुम्ही एवढ्या संपत्तीचे मालक कसे बनलात. विस वर्षे मंत्रीपदावर असताना यांना विकास करता आला नाही. अशा प्रवृत्तीच्या लोकांना खड्यासारखे बाजूला काढा. पाच, सात रस्ते न करताच लाखो रुपये घश्यात घालणारी ही माणसे गोरगरीबांवर अन्याय करतात असे शेवटी त्यांनी सांगितले.

     यावेळी अलका खंडागळे यांनी सासरे दगडू खंडागळे व पती भिमराव खंडागळे यांनी बावडा ग्रामपंचायतची शंभर वर्षे काम करूनही त्यांना सेवेत कायम केले नाही. उलट नोटीस न देताच वयाचे कारण देत कामावरून काढून टाकले. तर त्यांची मागील दहा वर्षातील पगारही दिली नाही असे उपस्थित मान्यवरासमोर आपले गाऱ्हाणे मांडले. तशाच पद्धतीने लतीका सुनील कांबळे यांनी मुलगा विनायक कांबळे हा ग्रामपंचायतचे पाणीपुरवठ्याचे काम करताना लाईटचा करंट बसल्याने उजव्या हाताची तीन बोटे जळून निकामी झाली. त्याच्या दवाखान्यासाठी दोन लाख साठ हजार रुपये काढून आमचे फक्त दिड लाख रुपयांचे बिल भरले तर एक लाख दहा हजार रूपये गायब केले असून त्याच्या कामाची पगारही दिली नसल्याचे उपस्थित मान्यवरांना सांगितले.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा