*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
कुत्र्यामुळे आयुक्तांच्या गाडीला अपघात, आयुक्त जखमी समाजप्रबोधनाची" *धारदार* आणि सडेतोड *पत्रकारिता* कशी असते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे "पञकार-इक्बाल मुल्ला" यांच्या मागील लेखातुन प्रकर्षाने "सिद्ध होते.
कारण सांगली महापालिका क्षेत्रात कुत्र्यांच्या बेसुमार संख्येने आणि समस्त महापालिका क्षेत्रातील नागरिक हैराण असताना मागील लेखात कुत्र्यामुळे आयुक्त अथवा महापालिका अधिकाऱ्यांच्या गाडीला दुर्दैवाने अपघात होईल, तेंव्हाच प्रशासन जागे होणार का ?? असा "प्रश्न" मी केला होता.
आज माझे भाकीत दुर्दैवाने खरे ठरले, कारण सांगली - मिरज रोडवर महापालिकेचे आयुक्त "शुभम गुप्ता" यांच्या गाडीसमोर कुत्रे आडवे आल्यामुळे त्यांची गाडी विजेच्या खांबावर" धडकली आणि आयुक्त जखमी झाले. त्यांना समर्थ हॉस्पिटल मध्ये तात्काळ ऍडमिट करण्यात आले. सांगलीकरांच्या "आशीर्वादाने" आणि सुदैवाने त्यांची प्रकृती "स्थिर" आहे.
*डॉग व्हॅन ची संख्या वाढविण्याची गरज !*
महापालिका क्षेत्रात 2-3 लाख लोक असताना "दोन डॉग व्हॅन" तोकड्या पडतात. त्यामुळे किमान 1 डझन अत्याधुनिक डॉग व्हॅन महापालिकेला आवश्यक आहेत. कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आणि कमी असणारे डॉग व्हॅन यामुळे "सांगली महापालिका" क्षेत्रातील लोकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. 2 वेळा नसबंदी न केल्याने मादा कुत्री पुन्हा गरोदर राहतात.व पुन्हा पिलांची पैदास होते त्यामुळे ठेकेदाराला 2 नसबंदी केलेल्या कुत्र्यांचेचं पैसे महापालिकेने द्यावेत .अन्यथा 1 रुपया देखील देऊ नये.
भविष्यातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ,आता तरी आयुक्त आणि महापालिकेने कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवावे.आणि सांगलीकरांचे "आशीर्वाद" घ्यावेत.
*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा