Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०२४

*तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदीर संस्थान चे अर्थिक गैर व्यवहार केलेले माजी धार्मिक व्यवस्थापका वर कारवाई करावी--अमोल जाधव!*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*
 *मो;--9730 867 448*
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर येथील
माजी धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्यावर योग्यती कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी
  अमोल शिवाजीराव जाधव रा. तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव. मो.क्र. 7875296111.
यांनी जिल्हाधिकारी  तथाअध्यक्ष श्री तुळजाभवानी  मंदिर संस्थान 
आणि तुळजापूर चे तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान तुळजापूर यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आसुन या  बाबत सविस्तर वृत्त  असेकि,
1. दिनांक 22/09/2023 रोजी वेळ संध्याकाळी 7:00 ते 10:00 दर्शन मंडप तळ मजला येथील कर्तव्यावर असलेले सुरक्षा रक्षक वैभव गहीनीनाथ गंभिरे व , सचिन शिवाजी पवार यांनी केलेली चोरी CCTV फुटेज मध्ये कैद असताना व त्याची नोंद रजिस्टर मध्ये नमुद असताना त्यावेळेस धार्मिक व्यवस्थापक म्हणुन कार्यरत असलेले नागेश शितोळे यांनी त्यांच्याशी हातमिळवणी करुन पदाचा व अधिकाराचा गैरवापर केला असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन त्यांना मंदिर संस्थानमधुन अस्थापनेवरुन बडतर्फ करण्यात यावे. 
2. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे हाऊसकिपींग, स्वच्छता पुरवण्याचे कंत्राट मिळालेली ISF कंपनी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या कंपनीस हाऊस किपिंगचे काम देण्यात आले अंदाजे 05 दिवसापुर्वी या कंपनीस सफाई कामगारांचे मटेरीयल पुरविण्याचे काम देण्यात आलेले आहे. तरी सदर कंपनीचे मॅनेजर लेखासिंग यांच्याशी नागेश शितोळे यांनी आर्थिक गैरव्यवहार करुन लेखासिंग यांनी त्यांच्या नावे असलेले वाहन क्र. MH20 GO1549  ही अलकेझर वाहन हे नागेश शितोळे यांना गिफ्ट देवुन नागेश शितोळे यांच्याशी आर्थिक देवाणघेवाण करुन आत्तापर्यंत मंदिर संस्थान येथील विविध कामामध्ये सदर कंपनीस टेंडर मिळवुन देवुन मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण केलेली आहे. त्यामुळे मंदिर संस्थानचे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे नागेश शितोळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन त्यांना मंदिर संस्थानमधुन अस्थापनेवरुन बडतर्फ करण्यात यावे.
3. नागेश शितोळे यांचे मेहुना  भोसले हा मंदिर संस्थानच्या साडी विक्री केंद्रावर कार्यरत असुन भाच्चा भोसले हा सिक्युरीटी गार्ड मध्ये कार्यरत आहे. सदर दोन्ही व्यक्ती या मंदिर संस्थानच्या अधिकृत सेवेत नसताना सदर व्यक्तीस नागेश शितोळे यांनी बेकायदेशीर मंदिर संस्थानचे कॉर्टर राहाण्यासाठी दिलेले आहे. त्यामुळे नागेश शितोळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन त्यांना मंदिर संस्थानमधुन अस्थापनेवरुन बडतर्फ करण्यात यावे.
4. (दिपा मुधोळ- मुंडे) जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मदिर संस्थान तुळजापूर या कार्यरत असताना संकेत वाघे व नागेश शितोळे यांच्यावर मंदिर संस्थानमधील लाडु घोटाळ्याचे आरोप असताना सदर घोटाळयाची चौकशी न करता मा. जिल्हाधिकारी यांची बदली झाल्यानंतर सदर लाडु घोटाळ्याची संचिका दोनच दिवसात बेकायदेशीर जिल्हाधिकारी यांच्याकडे देवुन घाई गडबडीत फाईलवर सही घेवुन त्यांना क्लीन चिट देण्यात आली. तरी यांची सखोल चौकशी होवुन यात गुंतलेल्या सर्व व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करुन त्यांना सेवेतुन बडतर्फ करण्यात यावे ही विंनती.
5. नागेश शितोळे यांना ३ आपत्य असुन त्यांनी मंदिर व शासनाची फसवणुक केलेली आहे. अनेक VIP पास मध्ये अधिकाऱ्याला दमदाटी करणे, सिक्युरीटीला दम  देवुन मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट केलेली आहे. व आनेक कंपन्यासोबत सिक्युरीटी व हाऊस किपींगचे काम देतो म्हणुन आर्थिक व्यवहार केलेले आहे. तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष हे माझ्या मर्जितील असुन मी तुमची येथे बदली केलेली असे असे म्हणुन अधिकारी व कर्मचारी यांना दमदाटी करुन त्यांच्याकरवी बेकायदेशीर काम करुन घेवुन स्वत:चा आर्थिक फायदा करुन घेतलेला आहे. त्यामुळे नागेश शितोळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन त्यांना मंदिर संस्थानमधुन अस्थापनेवरुन बडतर्फ करण्यात यावे.


तरी वरील मुद्देनियम बाबींची चौकशी नागेश शितोळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन व अपहारीत रकमा वसुल करुन त्यांच्यावर गुन्हे नोंद करुन त्यांना मंदिर संस्थानमधुन अस्थापनेवरुन बडतर्फ करण्यात यावे.अशा मागण्या अमोल शिवाजी जाधव यांनी निवेदनाद्वारे 
केल्या आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा