उपसंपादक -- नूरजहाँ शेख
टाइम्स ४५ न्यूज मराठी
लेखक इंद्रजीत पाटील लिखित शेलक्या बारा या कथासंग्रहास अल्पावधीतच पाचवा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला. धृपद एन्टरटेनमेंटच्या साैजन्याने साहित्यवलय पुरस्कार - २०२४ ने लेखक इंद्रजीत पाटील यांना सन्मानित करण्यात येणार आहे.येत्या २५ ऑक्टोबर २०२४,वार शुक्रवार राेजी सकाळी ११.०० वा. डाॅ.काशिनाथ घाणेकर लघुनाट्यगृह,ठाणे या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,राेख रक्कम,शाल,श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून ग्रामीण भागातील या प्रतिभावन लेखकाचे बार्शी तालुक्यात विशेष काैतुक हाेत आहे.मा.श्री.पंडीतराव लाेहाेकरे,चंद्रकांत पाटील,संजय भड,अमाेल देशमुख,राकेश गरड यांनी लेखक इंद्रजीत पाटील यांचे अभिनंदन केले व भावी साहित्यिक वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा