Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०२४

*अकलूज येथे" महात्मा बसवेश्वर" बहुउद्देशीय संस्थांच्या वतीने गरबा-- दांडिया स्पर्धा संपन्न*

 


*उपसंपादक -- नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

अकलुज येथे महात्मा बसवेश्वर बहुउदेशीय संस्थाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमीत्त गरभा- दांडिया स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.या स्पर्धा महादेव देवालय,नष्टे होंडा,शिव-लिला एक्झिक्युटिव्ह Bhavesh विद्यमाने आयोजित करण्यात आल्या होत्या.



           या स्पर्धेचे उद्घाटन देवीच्या प्रतिमेचे पूजन लिंगायत समाज महिला अध्यक्ष शीला जठार उपाध्यक्ष श्वेता गुळवे यांनी केले तर दीप-प्रज्वलन भजनी मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला गुळवे,शिल्पा नष्टे,पुष्पलता गुळवे,वंदना शेटे यांच्या हस्ते करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.या कार्यक्रमासाठी वीरशैव लिंगायत महिला मंडळ यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवून या कार्यक्रमाची शोभा वाढविली.



             या गरभा व दांडिया नृत्य स्पर्धेतील विजेती तेजश्री कथले,बेस्ट दांडिया-निशा कुरूडकर,बेस्ट एक्सप्रेशन-डॉ शितल शेटे,बेस्ट गरभा-शिला जठार,बेस्ट ड्रेपरी-ज्योती नरुळे, बेस्ट एनर्जेटिक परफॉर्मन्स- शकुंतला गुळवे यांचा प्रशिस्तीपत्रक व ट्रॉफी देवून सत्कार करण्यात आला.या स्पर्धेचे परिक्षक काम रुनाल व्होरा व नेहा फडे यांनी जबाबदारी पार पाडली.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विजया गुळवे,विद्या शेटे,अंजली गुळवे,संजना शेटे,ऋतुजा आर्वे,प्राजक्ता जठार,तेजश्री कथले,शिल्पा जठार,अरुंधती गुळवे यांनी परिश्रम घेतले.

       या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पृथांजली शेटे व सारिका गुळवे यांनी केले.सर्व लिंगायत महिला व महात्मा बसवेश्वर बहुउदेशीय संस्था सदस्या व वीरशैव लिंगायत महिला मंडळाच्या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा