Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १३ ऑक्टोबर, २०२४

*ऐन सणासुदीच्या दिवसात मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीच्या पदरी निराशाच?.....* *बँकांनी केवायसी करण्याचे सक्तीचे केल्यामुळे महिला वर्गातून नाराजी*


 

*जेष्ठ -----पत्रकार*

*संजयभाऊ---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

दस-याच्या सणाला मुख्यमंत्री यांच्या लाडकी बहिण बॅंकेत खात्यावर जमा झालेले पैसे काढायला गेल्या असता बहिणीच्या पदरी आली निराशा आली असून बॅंकांनी केवायसी केल्याशिवाय बहिणींना पैसे मिळणार नाही असे त्यांना सांगण्यात आले आहे.बॅंकांनी केवायसी केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी त्यांना पैसे मिळणार आहेत.त्यामुळे लाडक्या बहिणी पैसे मिळत नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी ऐन सणासुदीच्या दिवशी हताश झाल्या दिसून येत आहेत.

        लाडक्या बहिणांना बॅंकांनी पास बुक,आधारकार्ड व पॅनकार्ड आणल्यानंतर केवायसी केले जात असल्यामुळे खेड्या पाड्यातील महिला वास्तविक पॅनकार्डची गरज नसताना मात्र बॅंकानी पॅनकार्ड सक्तीचे केले असल्यामुळे आता या बहिणींची पॅनकार्ड काढण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.ग्रामीण भागात शेतात मोलमजुरी करून घरचा प्रपंच करणा-या महिलांचे वर्षिक उत्पन्न जेमतेम २० ते २५ हजार असते.त्यामुळे त्यांना कधीच पॅनकार्ड काढण्याची गरज पडली नाही आहे.त्यामुळे लाडक्या बहिणींना हाती केव्हा व कधी पैसे मिळणार हा गंभीर प्रश्न तालुक्यातील महिलांसमोर निर्माण झाला आहे.



            आज तागायत लाडक्या बहिणींच्या खात्यावर साडे सात हजार जमा झाले आहेत.पण राष्ट्रीय बॅंकांनी विविध कर आकारून त्यांच्या पैशाला कात्री लावली आहे असे निदर्शनास आले आहे.या लाडक्या बहिणींच्या रक्कमेवर जीएसटीच्या कराची आकारणी करण्यात आली आहे.वास्तविक पहाता लाडक्या बहिणींना पुर्ण रक्कम त्यांना मिळाली पाहिजे असे शासनाचा आदेशअसताना बॅंका मात्र विविध कर आकारून लाडक्या बहिणींच्या खात्यात शासनाची जमा झालेल्या रक्कमेतून कर वसूल करत आहेत.त्यामुळे भीक नको पण कुत्रे आवर म्हणायची वेळ बहिणींवर आली आहे.

           अकलूज परिसरातील बॅंकांमध्ये ग्रामीण भागातील महिलांनी ५० ते ६० किलोमीटरवरून येऊन बचत खाते काढलेले आहे.बॅंकेच्या खात्यातील रक्कम काढण्यासाठी या महिलांना एक हेलपाटा मारण्यासाठी त्यांना दोन शे ते तीन शे रूपये प्रवास खर्च येतो.त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या लाडक्या बहिणींना दिवाळी पुर्वी संपुर्ण रक्कम मिळायला पाहिजे.अन्यथा या लाडक्या बहिणींना ऐन दिवाळीच्या सणात शिमगा साजरा करण्याची वेळ येऊ नये अशी मुख्यमंत्री साहेब यांनी बहिणींची काळजी घ्यावी अशी लाडक्या बहिणींची अपेक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा