*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
रोटरी क्लब अकलूज आणि जिजाऊ ब्रिगेड तालुका माळशिरस यांच्या संयुक्त विद्यमाने समाजात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान करण्यात करण्यात आला. या सन्मान सोहळ्याचे आयोजन दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी, सकाळी 10 वाजता कृष्णप्रिया मल्टीफंक्शनल हॉल, संग्राम नगर, अकलूज येथे झाले
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील, अध्यक्ष, डॉटर्स मॉम फाउंडेशन आणि चेअरमन शिवरत्न शिक्षण संस्था या उपस्थित राहत सर्व नवदुर्गांचे कौतुक केले आणि अशा ह्या विविध क्षेत्रात आपण उल्लेखनीय काम करत आहात त्याबद्दल आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजक रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष रो. सौ. प्रिया नागणे, सचिव रो. मनिष गायकवाड, , उपाध्यक्ष रो. नवनाथ नागणे, संचालक रो. अजित वीर, रो. कल्पेश पांढरे, रो. केतन बोरावके, रो. हनुमंत सुरवसे, रो. आशिष गांधी, रो. बबनराव शेंडगे, रो. पोपट पाटील, रो. आशा शेख तसेच जिजाऊ ब्रिगेड माळशिरसच्या तालुका अध्यक्षा शिवमती मनोरमा लावंड, जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य प्रांतिक सदस्या शिवमती अक्काताई माने व जिजाऊ ब्रिगेड तालुका माळशिरस चे सर्व सदस्य यांनी पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुहास उरवणे सर यांनी केले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान हे गौरव पत्र आणि रोप देऊन करण्यात आले. यामध्ये
शोभा तानाजी वाघमोड (पत्रकार - माळशिरस तालुका प्रतिनिधी)
निया जबी शरफुद्दीन तांबोळी (आरोग्य सेविका)
जयश्री शंकर अटक (सफाई कामगार जिल्हा उप रुग्णालय नातेपुते)
शितल दळवी (व्यावसायिक, अकलूज)
विद्या वाघमारे (महिला वकील, जिल्हा उप न्यायालय माळशिरस)
कुमारी प्राची बाबर (महिला पोस्टमन)
उर्मिला सतीश हरिहर (महाराष्ट्र राज्य परिवहन बस वाहक)
अलका कदम (महाराष्ट्र राज्य, पोलीस हवालदार)
मनीषा जाधव (आरोग्य सेविका, राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार विजेत्या) यांचा सन्मान करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा