प्रतिनिधी =शकूर तांबोळी, अकलूज.
*अकलूज दि.२ ऑक्टो. -- येथील सदाशिवराव माने विद्यालयात २ऑक्टो.२०२४ वार बुधवार रोजी राष्ट्रपिता म.गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री या दोन महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली.* *या कार्यक्रमाचे नियोजन वर्गशिक्षिका सौ. सोनवणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इ.९वी तु.क च्या वर्गाने केले.प्रारंभी चि.समर्थ सलगर याने कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून मा. मुख्याध्यापक श्री.फुले सर यांची कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी निवड केली.* *अध्यक्षपदाच्या सूचनेस चि.प्रेम घोगरे याने अनुमोदन दिले.*
*राष्ट्रपिता म. गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मुख्याध्यापक श्री.फुले सर,मा. उपमुख्याध्यापक श्री.घंटे सर,मा. उपप्राचार्य श्री. सय्यद सर,मा. उपप्राचार्य श्री. बी.पी.शिंदे सर, सर्व पर्यवेक्षक श्री.डी.आर.मगर सर, श्री.बोरावके सर, श्री.बी.बी.पाटील सर, शिक्षकप्रतिनिधी श्री.काळे सर, श्री. एस.एम.जाधव सर, महिला प्रतिनिधी श्रीमती राऊत मॅडम, वर्गशिक्षिका सौ. सोनवणे मॅडम, सर्व विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी, म.गांधींच्या भूमिकेतील चि. यशराज झंजे व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या भूमिकेतील चि.वेदांत काशिद यांच्या हस्ते करण्यात आले.*
*विद्यालयाचा संगीत विभाग श्री.एस.ए.पवार सर, श्री.राजगुरू सर व कु. स्नेहा शिंदे मॅडम यांनी बापूजींची आवडती भजने 'रघुपती राघव राजाराम, पतित पावन सिताराम' व 'वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड पराई जाने रे' यांचे गायन केले. त्यांना उपस्थित सर्वांनीच उत्स्फूर्तपणे साथ दिली.*
*या थोर महापुरुषांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपिता म.गांधी यांच्या जीवनचरित्राचा परिचय कु.तनुजा दुपडे हिने आपल्या भाषणातून करून दिला तर लालबहाद्दूर शास्त्रींच्या जीवन कार्यावर चि. विश्वजीत देवकुळे याने आपल्या भाषणातून प्रकाश टाकला.*
*वर्गशिक्षिका सौ.सोनवणे मॅडम यांनीही याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. त्यांनी या दोनही महापुरुषांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग सांगितले व त्यांची थोरवी स्पष्ट केली.*
*या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रावणी लोंढे, कु. निरंजना इंगोले व कु.सई होनमाने यांनी केले तर आभार कु.श्रेया देशमुख हिने मानले.*
*सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल वर्गशिक्षिका सौ. सोनवणे मॅडम, कार्यक्रमात सहभागी असणारे इ.९वी (क) मधील विद्यार्थी तसेच महात्मा गांधींच्या वेशभूषेतील चि. यशराज झंजे व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या वेशभूषेतील चि. वेदांत काशिद या सर्वांनाच मा. मुख्याध्यापक श्री.फुले सर यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.*
*या कार्यक्रमास मा. मुख्याध्यापक, मा. उपमुख्याध्यापक, मा.उपप्राचार्य, सर्व पर्यवेक्षक, शिक्षक प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.*... प्रतिनिधी =शकूर तांबोळी, अकलूज.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा