Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०२४

l*अकलूज येथील मरीआई देऊळवाले समाजासाठी शासनाचा विविध योजनाच्या लाभासाठी शिबिर संपन्न*


 

*अकलुज---  प्रतिनिधी*

 *रियाजभाई  तांबोळी*

 *टाइम्स 45  न्युज मराठी*

अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे महसूल प्रशासन व नगरपरिषद अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने मरीआई देऊळ वाले समाजासाठी विशेष मतदार नोंदणी अभियान व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच उपजिल्हा रुग्णालय अकलूज यांच्या विशेष सहकार्याने

दिनांक 4. 10. 24 रोजी सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. होते सदर शिबिरास अकलूज व परिसरातील मरीआई देऊळ वाले समाजातील घटकांना विविध योजनांचा लाभ व्हावा या उद्देशाने अकलूज येथील उपविभागीय अधिकारी पांगरकर मॅडम , तहसीलदार  शेजुळ , अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद.गोरे  यांचे मार्गदर्शनाखाली  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अकलूजचे मंडलाधिकारी  लकडे मॅडम, जिल्हा उप रुग्णालय  अकलूज येथील डॉक्टर व कर्मचारी  वर्ग , अकलूज सज्जाचे तलाठी  शिंदे भाऊसाहेब ,  भानवसे भाऊसाहेब,  धनवडे भाऊसाहेब,यशवंतनगरचे तलाठी काळे मॅडम, निकम मॅडम यांनी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.



मरी आई देऊळ वाले समाजातील लोकांचे आरोग्य विषय तपासणी , आधार कार्ड, शिधापत्रिका  व इतर शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले. विविध क्षेत्रातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. सदर शिबिरात  समाजातील दोनशे ते तीनशे लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा