अकलूज प्रतिनीधी- केदार लोहकरे
कै.कल्पना शामराव भाले (मधुरा अनिल आगाशे) यांचे स्मरणार्थ प्रसिद्ध सिने,नाट्य कलाकार लेखिका,दिग्दर्शिका रसिका आगाशे यांनी माळीनगर येथील दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील हुशार व गरजू विद्यार्थिनी कु.दिव्या चव्हाण (इ.९ वी),कु.दिव्या सरवळे(इ.१० वी), कु.प्रणोती सरतापे (इ.११ वी शास्त्र),कु. प्रांजली साळुंखे (इ.१२ वी शास्त्र) या चार विद्यार्थिनींना प्रत्येकी तीन हजार रुपये रक्कम शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून दिली.
कै.कल्पना भाले ह्या रसिका आगाशे यांच्या आई असून त्या मॉडेल विविधांगी प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आहेत.त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपल्या मुलांचे शिक्षण आणि त्यांचा सर्वांगीण विकास यावर कायम भर दिला.त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण न झाल्याची रुखरूख त्यांना कायम होती.आर्थिक अभावामुळे कोणाचे शिक्षण अपूर्ण राहू नये ही त्यांची इच्छा होती.म्हणून त्यांचे स्मरणार्थ रसिका आगाशे दरवर्षी काही रक्कम गरजू विद्यार्थ्यांना मदत करू इच्छितात.
माळीनगरचे शिल्पकार कै. हरिभाऊ बळवंतराव गिरमे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाप्रसंगी सदरच्या आर्थिक मदतीच्या रक्कमेचे वाटप दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अजय गिरमे यांचे हस्ते विद्यार्थिनींना करण्यात आले. यावेळी प्रशालेचे प्राचार्य कलाप्पा बिराजदार,उपप्राचार्य रितेश पांढरे,पर्यवेक्षक कल्याण कापरे, राजीव देवकर,रश्मी ढोक आदी उपस्थित होते.कार्यक्रमास सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बांदल यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा