Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

*माळशिरस तालुक्यातील 3 दिग्गजा पैकी एकाला - "पंजाबराव देशमुख कृषी सेवा रत्न "तर दोघांना "वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार" प्रदान*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

माळशिरस तालुक्यातील तीन दिग्गज कृषी रत्न यांचा राज्यपाल ,मुख्यमंत्री , कृषी मंत्री ,कृषी सचिव , आयुक्त यांच्या हस्ते यथोचित सन्मान !                              महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण 29 सप्टेंबर रोजी मुंबई येथे संपन्न झाला .माळशिरस कृषी क्षेत्र मधील सेंद्रिय शेती पद्धती व विकास व यामध्ये नाविन्यपूर्ण काम करणारे निमगाव चे सुपुत्र श्री जगनाथ पंढरीनाथ मगर यांना पुणे विभागाचा मानाचा सेंद्रिय शेतीमधील वसंतराव नाईक सेंद्रिय शेती कृषी भूषण पुरस्कार व दोन लाख रुपये बक्षीस प्रदान करण्यात आले .चौंडेश्वर वाडी गावचे सुपुत्र श्री तानाजीराव भानुदास इंगवले देशमुख यांना कृषी यांत्रिकीकरण सह एकात्मिक शेती पद्धतीने उत्पादन कमी खर्च करून शाश्वत उत्पादनासाठी केलेल्या कामासाठी वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार व एक लाख रुपये बक्षीस देऊन प्रदान करण्यात आला .तालुक्यात बावीस वर्षे सेवा करणारे माळेवाडी अकलूज गावचे सुपुत्र श्री सतीश कुंडलिक कचरे यांना कृषी नागरी सेवा क्षेत्रात एकमेव द्वितीय उदाहरणार्थ राज्यातील पहिले आयएसओ मंडल कार्यालय ,कृषी उत्पादन व महसूल वाढवण्यासाठी केलेले काम ,43 राज्य स्तर विभाग सर जिल्हास्तर तालुकास्तर पीक स्पर्धा विजेते लाभार्थी घडविले,डिजिटल इंडिया चा एक भाग म्हणून विविध योजना विषय यांचे डिजिटल 40 qr कोड तयार करून मार्गदर्शन व कृषी क्षेत्रात प्रचार ,प्रसिद्धी ,प्रसार या क्षेत्रातील उल्लेखनीय उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल डॉक्टर माननीय श्री विठ्ठल राव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला .या तिन्ही पुरस्कारासाठी नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण एकमेव द्वितीय प्रमाणपत्र , रेशीम जडीत शाल, विद्येची देवता गणपतीची मूर्ती व पत्नीसाठी रेशमी साडी शाल व पती-पत्नींना महाराष्ट्राचा मानाचा फेटा बांधून महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल माननीय श्री सी आर राधाकृष्णन,राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार,राज्याची कृषिमंत्री माननीय श्री धनंजय जी मुंडे व राज्य कृषी विभागाच्या प्रधान सचिव सौ जयश्री भोज राज्याचे कृषी आयुक्त श्री रवींद्र बिनवडे व कृषी विभागाचे संचालक महोदय या मान्यवरांच्या हस्ते तोचित सन्मानासह पुरस्कार प्रदान करण्यात आले .सेंद्रिय शेती रत्न ,एकात्मिक शेती पद्धती रत्न व कृषी रत्न यांचे तालुका भर वाहः वा ह करण्यात येत आहे .यांचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा