*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
, तुळजापूर विधानसभा मतदार संघात हंगरगा( नळ )येथे बोगस मतदार यादीमध्ये नोंदणी करण्यात आलेले निदर्शनास आले आहे त्या बोगस मतदारावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे अमोल शिवाजी जाधव यांनी निवेदनाद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार तुळजापूर यांचेकडे केले आहे याबाबत सविस्तर निवेदनाद्वारे केलेली मागणी अशी की
तुळजापूर तालुक्यातील विधानसभा मतदार संघातील बोगस मतदार यादीत नावे नोंद करण्यात आलेली आहेत. हंगरगा (नळ) येथे बाहेरच्या मतदाराचे मतदान नोंद केले आहे. तरी त्यांची नावे अशी 1. तुषार पंकज इनागटे, 2. आरोही सगाटे, 3. नीलिमा रबाळे, 4. शैलेश किशोर सालगे, 5. भूगी सावरे, हंगरगा (नळ) ह्या गावात नावे आढळुन आली आहेत. तरी विधानसभा मतदार संघात 400 मतदार केंद्र असुन प्रत्येक बूथ वरील बोगस मतदाराची पडताळणी करण्यात यावी व आपले शासकीय बियल कर्मचा-यांना योग्य सुचना देवून बोगस मतदारावर दंडात्मक कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले असून लवकरात लवकर बोगस मतदारावर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल. असाही इशारा निवेदनाद्वारे दिला आहे
माहितीस्तव सविनय सादर.
मा. तहसिलदार तथा निवडणुक निर्णय अधिकारी साहेब, तुळजापूर. सोबतः नावे जोडत आहे.
अमोल शिवाजीराव जाधव शिवसैनिक, उध्दव बाळासाहेब ठाकरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा