*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
डांगे वस्ती महाळुंग (ता.माळशिरस) येथे सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एक भीषण अपघात घडला.संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग नॅशनल हायवे ९६५ जी वरील अपूर्ण व बेभरवशाच्या रस्त्यामुळे पुन्हा एकदा निष्पाप जीवांना अपघाताला सामोरे जावे लागले.
महाळुंग येथील स्थानिक अमन हजरत डांगे (इयत्ता १० वी), रेहान आमीन डांगे (इयत्ता ११ वी) आणि प्रतीक प्रकाश भोसले (इयत्ता १२ वी) हे तिघे विद्यार्थी सायंकाळी सुरक्षित ठिकाणी दुचाकी शेजारी थांबलेले असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या मारुती सुझुकी स्विफ्ट (MH-45 AD-8739) या गाडीने बॅरिकेट तोडून थेट त्यांच्या अंगावर धडक दिली. या गाडीने बॅरिकेट आणि जाळी ओलांडून विद्यार्थ्यांना उडवत पुढे गेली.या अपघातात अमन आणि प्रतीक हे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर अकलूज मधील अश्विनी हॉस्पिटल आणि गुळवे हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.जखमींच्या हाताला, पाठीला आणि बरगड्यांना मोठ्या प्रमाणात इजा झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
विशेष म्हणजे याच ठिकाणी वीस दिवसांपूर्वी अपघात झाला होता.येथील विजेच्या ट्रान्सफॉर्मरवर एक चार चाकी वाहन आदळल्याने मोठ्या अपघाताची घटना घडली होती. या अपघातात ट्रान्सफॉर्मरचे मोठे नुकसान झाले होते आणि वाहनातील काही प्रवासी जखमी झाले होते.याच रोडला पुढे बोरगाव येथे उड्डाणपुलाखाली सर्विस रोडला एका बालकाचा गतिरोधक नसल्यामुळे जीव देखील गमवावा लागला होता.
या ठिकाणी वारंवार घडणाऱ्या अपघाताच्या घटनांमुळे डांगेवस्ती परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
स्थानिकांनी लोकांनी अनेक वेळा नॅशनल हायवे प्राधिकरणाकडे अपुऱ्या कामांविषयी तक्रारी करूनही योग्य तो प्रतिसाद मिळालेला नाही.ग्रामस्थांची मागणी – आता पुरे ! ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत आता पुढील अपघात टाळण्यासाठी खालील मागण्या केल्या आहेत.अपूर्ण काम त्वरित पूर्ण करावे.दोन्ही बाजूंना पथदिवे बसवावेत.योग्य दिशादर्शक फलक लावावेत.सर्व्हिस रोड तत्काळ सुरू करावा.सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाय योजना कराव्यात ग्रामस्थांनी सांगितले की,जर लवकरच प्रशासनाने दखल घेतली नाही तर या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.त्या संदर्भात लवकरच एक निवेदन संबंधित बांधकाम विभागाला देण्यात येणार आहे.
*चौकट*
डांगे वस्ती महाळुंग येथील हा रस्ता अपघाताचे क्षेत्र बनलेले आहे.बांधकाम विभागाने तात्काळ काम न केल्यास स्थानिक bग्रामस्थ रस्ता रोको आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
*जावेद डांगे*
स्थानिक ग्रामस्थ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा