Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ६ जुलै, २०२५

*अकलूज येथील मंदिरात यात्रेनिमित्त मंदिर स्वच्छतेचा उपक्रम*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

अकलूज गावची ग्रामदेवता श्री अकलाई देवीची यात्रा (भंडारा) येत्या शुक्रवारी दि.११ रोजी आयोजित करण्यात आला आहे.त्यानिमीत्त अकलूज गावातील विविध मंडळे सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांनी आज अकलाई मंदिर व मंदिराचा परिसराची साफसफाई करून स्वच्छता केला.

        हा मंदिर स्वच्छता अभियानाचा उपक्रम अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील यांनी सन १९८० सालापासून आजतागायत जवळ जवळ ४५ वर्ष अकलूजमधील विविध मंडळे,सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून राबविला जात आहे.या उपक्रमात तरूण मंडळी ही उत्साहाने भाग घेऊन मंदिर परिसराची स्वच्छता केला आहे. यामध्ये पाण्याने मंदिराच्या शिखरापासून मंदिराचा गाभारा व परिसर स्वच्छ धुऊन काढला तसेच देवीच्या मंदिरातील विविध भांडी आरती ताट,समई, पितळेची घंटा घासून स्वच्छ करण्यात आली तर सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दल व अकलूज नगरपरिषदेच्या टॅंकरने मंदिर स्वच्छतेसाठी पाणी देऊन खूप मदत केली.

           ही स्वच्छता करण्यासाठी अकलाई देवी भक्त मंडळ, साईबाबा सेवा ट्रस्ट,लोकमान्य गणेश मंडळ,शिवरत्न गणेश मंडळ,पगडीचा राजा गणेश मंडळ,स्वामी भक्त मंडळ, क्रांतीसिंह रिक्षा स्टाॅप, वीरशैव लिंगायत समाज,वडर समाज, बुरूज समाज,मातंग समाज, बौद्ध समाजातील युवकांनी सहकार्य केले.हा उपक्रम पार पडण्यासाठी किशोरसिंह माने-पाटील यांचे मित्र मंडळ त्रिंबक तात्या गुळवे,विठ्ठल गायकवाड,ॲड.राजू आर्वे,उमेश शेटे,अशोक गुजर,बाळासाहेब रिसवडकर,रशीद तांबोळी,विजय टोंगळे व अकलाई देवीचे पुजारी गुरव बंधू यांचे सहकार्य लाभले.




*चौकट*

अकलाई देवीच्या मंदिरात गेली ४५ वर्षांपासून हे भक्तगण मंदिर परिसराची साफसफाई व स्वच्छतेसाठी येत असतात पण यामधील काही काही लोक वयोवृद्ध झाली आहे.त्यामुळे पुढील वर्षीपासून नवीन तरूण वर्गांनी या उपक्रमात सहभागी होऊन ही परंपरा पुढे चालू ठेवावी असे आवाहन केले 


*किशोरसिंह माने-पाटील*

          माजी सरपंच,

अकलूज ग्रामपंचायत,अकलूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा