Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ८ जुलै, २०२५

*निमगाव (म)- ता.माळशिरस येथील सोलापूर डीसीसी बँक शाखेत सोने तारणात आढळले नकली सोने*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

*आता या प्रकरणात वेळापूर पोलीसांचा तपास कार्याचा लागणार. खरा कस*


सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा निमगाव (मगराचे) ता.माळशिरस,जि. सोलापूर या शाखेमध्ये सुमारे २७ कर्जदारांनी तारणासाठी ठेवलेल्या सोन्यामध्ये काही प्रमाणात नकली सोने असल्याचे आढळून आल्याने कर्जदारात खळबळ उडाली आहे.सदरची रक्कम सुमारे २९ लाख रुपये इतकी आहे. 

            निमगाव शाखेतील सोने तारण ठेवलेल्या सोन्याची मुख्य शाखेच्या अधिकारी व सोनारांनी तपासणी केली असता सुमारे २७ ग्राहकांच्या सोन्यामध्ये काही प्रमाणात नकली सोने असल्याची बाब निदर्शनास आली आहे. यावरून सोलापूर मुख्य बँकेकडून वेळापूर पोलिसांकडे सदर प्रकरणाचा तपास करण्यासाठी अर्ज देण्यात आला आहे.त्यावरून वेळापूर पोलीस नकली सोने आढळलेल्या ग्राहकांची,बँकेच्या सोनाराची व अधिकाऱ्यांची चौकशी करत आहेत.

              मागील दोन ते तीन वर्षांपासून सोने तारण ठेऊन कर्ज घेतलेल्या अनेक ग्राहकांना अचानक बँकेकडून फोन येऊ लागले कि,तुम्ही तारण ठेवलेले सोने नकली आढळले आहे.तरी तुम्ही तातडीने कर्जाऊ घेतलेली रक्कम बॅंकेत जमा करावी.ज्या ग्राहकांनी सोने तारण ठेऊन कर्ज घेतले आहे.त्यांची रक्कम भरायची तयारी आहे.परंतु रक्कम भरल्यानंतर त्यांना नकली सोने देण्यात येईल याची भीती वाटत आहे.आम्ही तर सोने तारण ठेवताना बँकेच्या सोनाराने सोने तपासून घेतले होते.आम्ही खरे सोने ठेवले होते.आम्हाला तशी बँकेने पावती दिली आहे. मग आता ते सोने नकली कसे झाले.हा ग्राहकांना प्रश्न पडला आहे.याबाबत अनेक ग्राहकांनी सोलापूरच्या मुख्य बँकेकडे तक्रार अर्ज दिला आहे. 

          याबाबत डीसीसी निमगाव शाखेचे शाखाधिकारी पठाण अलीमखान तैय्यबखान यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की,आमच्या बँकेने सोने तपासण्यासाठी प्रमोद क्षीरसागर या सोनाराची नेमणूक केली आहे.ग्राहक ज्यावेळी सोने तारणासाठी बँकेकडे येतो त्यावेळी आमचा सोनार सोने खरे असल्याची पडताळणी करून, वजन करून,त्याची,ग्राहकांची सही करून सोने पाकिटामध्ये सीलबंद करून आमच्याकडे देतो.आम्हाला सोन्यामधील खरे खोटे काही कळत नाही.आम्ही सोनाराच्या विश्वासावर ग्राहकाला कर्ज देतो.ज्या वेळी मुख्य बँकेतील अधिकारी व त्यांचे सोनार यांनी आमच्या शाखेतील सोने तपासले तेव्हा त्यांना व आम्हालाही २७ ग्राहकांच्या सीलबंद पाकिटामध्ये काही प्रमाणात सोने नकली असल्याचे समजले.त्यावरून सदर अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी.याकरीता वेळापूर पोलिसांकडे अर्ज दिला आहे. आमच्या सोनाराचा फोन गेल्या काही दिवसांपासून बंद लागत आहे.

            डीसीसी बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांना संपर्क केला असता ते म्हणाले की,या प्रकरणाबाबत वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरु आहे. त्यामुळे मी अधिक माहिती देऊ शकत नाही.


*चौकट*

*पाच ग्राहकांनी सोने सोडवून घेतले.*


डीसीसी बँकेच्या निमगाव शाखेत सोने तारण ठेवलेल्या २७ पैकी पाच ग्राहकांनी कर्जाची रक्कम भरून सोने सोडवून घेतले आहे. चौकशी सुरू झाल्यानंतर ग्राहकांसमवेत संगनमत केल्याची कबुली ब्रोकर असलेल्या सोनाराने दिली आहे. डीसीसी बँकेच्या सर्व शाखांमध्ये तारण म्हणून ठेवलेल्या सोन्याची सत्यता तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये निमगाव शाखेतील ग्राहक आणि सोनाराने केलेला बनाव उघडकीस आला.


*कुंदन भोळे*

प्रशासक,जिल्हा मध्यवर्ती बँक


*चौकट*


*सोनाराचा मोबाइल बंद*

सोलापूर डीसीसी बँक निमगाव शाखेने सोने तपासण्यासाठी प्रमोद क्षीरसागर या सोनाराची नेमणूक केली आहे.ग्राहक सोने तारणासाठी बँकेकडे येतो तेव्हा बँकेचा सोनार सोने खरे असल्याची पडताळणी करून, वजन करून,त्याची व ग्राहकांची सही करून सोने पाकिटामध्ये सीलबंद केले जाते.नंतर हे सीलबंद पाकीट आमच्याकडे दिले जाते.आम्हाला सोन्यामधील खरे खोटे काही कळत नाही. सोनाराच्या विश्वासावर ग्राहकाला कर्ज देतो. बँकेच्या प्रधान कार्यालयातील अधिकारी व त्यांचे सोनार यांनी निमगाव शाखेतील सोने तपासले तेव्हा त्यांना व आम्हालाही २७ ग्राहकांच्या सीलबंद पाकिटामध्ये काही प्रमाणात सोने नकली असल्याचे समजले.सध्या सोनाराचा फोन काही दिवसांपासून बंद लागत आहे.



*अलीमखान पठाण*

शाखाधिकारी,डिसीसी बॅंक निमगाव शाखा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा