इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
----- इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक पदी प्रतिक बिभिषण घोगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानिमित्त पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न करण्यात आला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या हस्ते इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक पदी प्रतिक बिभिषण घोगरे यांच्या निवडीनिमीत्त सन्मान करण्यात आला. यावेळी निरा भिमा कारखान्याचे संचालक हरीभाऊ घोगरे, बिभीषण घोगरे, गणेश घोगरे , जयदीप घोगरे आदि उपस्थित होते.
यावेळी इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, खरेदी विक्री संघाचे संचालक तसेच विविध गावातून आलेल्या सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन आदींनी उपस्थिती दाखवली.
---------------------------





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा