Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०२४

*ज्या E V M च्या पारदर्शकते बाबत सांशकता आहे त्या EVM वर भारतात बंदी घालावी ---इकबाल बाबासाहेब मुल्ला*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

EVM मशीन ला संपूर्ण भारतातील  मंदबुद्धी  अंधभक्त  "गोदी मीडिया" आणि भाजपा सह काँग्रेस मधील भाजपचे जे  "स्लीपर सेल"  आहेत त्या सर्वांचा विरोध आहे. EVM *पारदर्शी* नाही, हे माहित असतानाही ,आज "निवडणूक आयोग" आणि  सत्ताधारी हे "संगनमत" करून भारतीय मतदारांना फसवत आहेत.  व हे हरियाणा निवडणुकीतून "सिद्धही" झाले आहे.

तुमच्या - आमच्या खिशातील जो मोबाईल "हजारो किलोमीटर"  वरून हॅक केला जाऊ शकतो, तर निवडणूक आयोगाच्या ताब्यात असणाऱ्या EVM मशिन्स, ज्या "मतमोजणी"  पर्यंत त्यांच्याच ताब्यात. असतात ,त्यामध्ये  हेराफेरी  करता येणार नाही का ?? अमेरिका. मध्ये एका विद्यार्थ्याने  EVM  "हॅक"  करून,हें मशीन असुरक्षित असल्याचे जगासमोर सिद्ध केले आहे. असे असताना भारतात EVM चा "अट्टाहास" का ???

2009 साली भाजपच्या अडवाणी मुरलीमनोहर जोशी आणि सुषमा स्वराज्य यांनी EVM वर बंदी  आणण्यासाठीआणि बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्यासाठी  सर्वोच्च  न्यायालयाचा  दरवाजा ठोठावला होता. परंतु आज "सत्तेत" आल्यानंतर बॅलेट पेपर. वर निवडणुका घेण्यासाठी भाजपा का  घाबरते ??? 

बॅलेट पेपर वर निवडणुका घेतल्या गेल्या की दूध का दूध आणि पानी का पानी होईल म्हणून भाजपचा  बॅलेट पेपर ला "विरोध" आहे का ??? 

 हरियाणा मध्ये लोकसभेच्या उत्तरप्रदेश  प्रमाणे धक्कादायकरित्या 14 लाख  मते "जास्त" कशी पडली ???  3 दिवसापासून "स्ट्रॉंगरूम" मध्ये असणारी EVM मशीन 99% चार्जे  कशी झाली ??? अंधभक्तांकडे याचे उत्तर आहे का ???  आज तब्बल 20-25 जागांवर झालेला घोळ "लपला" गेला नाही,त्यामुळेच EVM भारतात "नको"  आहे.

महिला कुस्तीपटू , युवक, बेरोजगार, सर्वसामान्य जनता,शेतकरी ,महिला ,

व्यावसायिक, नोकरदार,या सर्वांचा प्रचंड "विरोध" असताना, *काँग्रेसला* "एक्झिट पोल" 60 जागा* दाखवत असताना आणि भाजपाला केवळ  15-20 जागा गृहीत धरले असताना भाजपा हरियाणा मध्ये कशी "निवडून"  येते ??? ही क्रूर "चेष्ठा" नव्हे का ??



आंदोलन करणाऱ्या जनतेवर "गाड्या घातल्या गेल्या 700 लोकांचे "बळी" गेले ,सर्वांचा विरोध असताना येथील मतदार भाजपाला निवडून देतील का ?? ज्यांच्या गळ्यात चपलांचे हार घातले गेले,ज्यांना "ग्रामीण" भागात हाकलून. लावण्यात आले,ज्यांना "चिखलातून" चालवण्यात आले त्यांना मतदार मतदान करतील का ???

ज्यांच्या मतांचा अपमान झाला ज्यांच्या आत्मसन्मानाला "ठेच" पोहोचली तो  हरियाणाचा मतदार आणि बहुतांशी जनता आज बेंबीच्या देठापासून  न्याय मागत आहे. हरियाणा मध्ये मतदारांनी  दिलेल्या मतांचा अपमान तो स्वीकारू शकत नाही. म्हणूनच  संविधानानुसार  कायद्यानुसार बॅलेट पेपर  वर भारतातील निवडणुका घेतल्या पाहिजेत, अन्यथा श्रीलंकेत ज्याप्रमाणे क्रांती. झाली ,जनता रस्त्यावर उतरली आणि सत्तेच्या स्वार्थी नेत्यांना बाहेर काढले, ज्याप्रमाणे बांगलादेश मध्ये क्रांती झाली,जनतेने संसद. ताब्यात घेतले,सर्व राजकीय नेते "बिळात" लपले, पंतप्रधान शेख  हसीना  यांना देश "सोडावा" लागला, तशीच क्रांती भविष्यात भारतात झाल्यास आश्चर्य वाटू नये.



आज केंद्रात भाजपच्या ठिकाणी काँग्रेस  जरी असती तरी भारतात  बॅलेट पेपर चाच "वापर" व्हायला हवा ही माझी "आग्रही भूमिका" आहे.

ज्या अमेरिका,ब्रिटन,फ्रांस ,

जपान अशा जगातील बलाढ्य देशांनी EVM वर बंदी घातली, ज्याच्या पारदर्शकतेबद्दल "सांशकता"  आहे, त्या  EVM वर भारतात "बंदी" घालायला हवी. 

आता बॅलेट पेपर  साठी  जनतेतून "उठाव" अर्थात "आग्रह " व्हायलाच हवा. कारण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांनी तसा "अधिकार" भारतातील जनतेला दिला आहे. बॅलेट पेपर शिवाय आता पर्याय नाही हेच "सत्य"  आहे.


 *इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा