उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्यातील युवा सेना ही सतत समाजिक कामात आग्रेसर असते.त्याचाच प्रत्यय आज पहायला मिळाला.अकलूज टेंभुर्णी रोडवरती २५/४ लवंग या ठिकाणी गेली चार महिने झाले पाच ते सहा फुट लांबीचा व एक फुट ते दीड फुट खोलीचा खड्डा पडला होता.गेली अनेक महिने झाले राजकीय पुढारी आणी नागरिक त्या खड्ड्याला बगल देऊन निघून जात होते परंतु तो खड्डा स्वतः किंवा अधिकाऱ्या कडून बुजवून घेण्याचा प्रयत्न कोणीच केला नाही.या खड्यात अनेक अपघात झाले आहेत.हे लक्षात घेता युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी स्वखर्चाने खडी,सिमेंट,वाळू आणून स्वतः तो खड्डा बुजवून घेतला.यावेळी शिवसेनेचे नेते पिंटू तात्या चव्हाण,रामभाऊ गायकवाड,लक्ष्मण वाघ,गोरख अंधारे,ओम पराडे,प्रशांत पराडे, अक्षय पराडे,रोहित इंगळे, विकास भोई,अमित भोई, आदित्य भोई इ.उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा