Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०२४

*नियमांचे उल्लंघन झाल्यास" राज्य निवडणूक आयोग" करणार कडक कारवाई*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 शांतता कालावधीत मतदारावर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी हसून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वर निवडणूक आयोग कारवाई करणे व असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य कार्यालयाने प्रसिद्धी पत्राद्वारे कळवले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की


मुंबई, दि. १८ नोव्हेंबर २०२४

राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवार, दि. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून शांतता कालावधी सुरू झाला. या काळात मतदान संपेपर्यंतच्या ४८ तासांमध्ये, लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम १२६ अंतर्गत मतदारांवर प्रभाव टाकणारा प्रचार आणि सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास, उपस्थित राहण्यास अथवा सहभागी होण्यास मनाई आहे. या अटींचे उल्लंघन झाल्यास दोन वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.



लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने निर्देश जारी केले आहेत. निवडणूक प्रचाराच्या शांतता काळामध्ये मुद्रीत माध्यमांमध्ये छापण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातीस जाहिरात पूर्व प्रमाणिकरण समितीची मान्यता असल्याशिवाय या जाहिराती वृत्तपत्रामध्ये छापू नये, अशा आयोगाच्या सूचना आहेत. दृकश्राव्ये माध्यमे (टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ आणि सोशल मीडिया) यावर प्रचाराच्या शांतता कालावधीत राजकीय जाहीरातींना मनाई आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा