*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
माळशिरस तालुक्यातील यशवंत नगर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा .उदयनगर ही एक अतिशय नावाजलेली उपक्रमशील व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणारी शाळा आहे .नुकतेच शैक्षणिक वर्ष 2026- 27 सुरू झालेले आहे उदयनगर शाळेच्या परिसरातील शिक्षण प्रेमी नागरिक श्री .हर्षद बापू भोसले यांनी उदयनगर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 101 दप्तर दिलेले आहेत
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उदयनगर ही ग्रामीण भागातील अतिशय चांगल्या दर्जाची मानली जाणारी शाळा आहे . या शाळेचा पट 105 असून चार शिक्षक कार्यरत आहेत .शाळेचे मुख्याध्यापक विलास जगदाळे सर अतिशय चांगल्या पद्धतीने शाळेचे व्यवस्थापन चालवत आहेत .शाळेमध्ये शिष्यवृत्ती तज्ञ असणाऱ्या सौ .वंदना उमेश शेटे व श्रीम .उज्वला भोसले मॅडम ,महाराष्ट्रातील आघाडीचे ग्रामीण कथाकार गणपत जाधव हे चारही शिक्षक ध्येयवेडे असून शाळेच्या गुणवत्तेसाठी सतत प्रयत्नशील असतात . सर्व शिक्षक ,शाळा व्यवस्थापन समिती मा.शिवाजीराव इंगवले देशमुख यांच्या प्रयत्नातून व . सन्माननीय मदनसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच लोक वर्गणीतून शाळेसाठी सुंदर अशा मुख्याध्यापक कार्यालयाची निर्मिती केलेली आहे .त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अवधूत माने व उपाध्यक्ष समीर शेख व सर्व शाळा व्यवस्थापन समिती शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असते . याचाच भाग म्हणून आज शाळेमध्ये 101 दप्तराचे वाटप चौंडेश्वरी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ . अलका शिवाजीराव इंगवले देशमुख त्याचबरोबर उपसरपंच सौ ,शीला गायकवाड त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य सौ.सुजाता शिंदे . सचिन सोनवणे, सौ सोनाली गवळी उपस्थित होत्या . व समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते . सदर कार्यक्रमात यशवंतनगर केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख श्री काळे सर यांनी अनमोल अशा प्रकारचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जाधव सर यांनी केले आणि उपस्थित यांचे आभार श्री. जगदाळे सर यांनी मांडले....




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा