Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

*राज्यात निवडणूक आयोगाची कारवाई --रोख रकमेसह दारूचा महापूर ,२६२ कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

मुंबई : विधानसभा निवडणुकीत एकीकडे राजकीय प्रचाराची धामधूम सुरू असतानाच राज्यात पैसा आणि दारूचा महापूर आला असून आतापर्यंत रोख रक्कम, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू मिळून २६२ कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या जप्तीत तब्बल ३४ हजार लिटरहून अधिक दारूचा समावेश आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मंत्रालयात पत्रकार परिषदेत सांगितले की, जप्त वस्तूंमध्ये जवळपास ३ हजार ९०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. तसेच १ हजार ४०० किलो सोने, चांदीसारख्या मौल्यवान धातूंचाही समावेश आहे.


४ नोव्हेंबरपर्यंतची जप्ती

1.रोख रक्कम ६४.५० कोटी


2.दारू - ३४ लाख ८९ हजार ८८ लिटर ३३.७३ कोटी


3.ड्रग्ज ३८२४.४२२ किलो ३२.६७ कोटी मौल्यवान धातू- १४२८.९८३ किलो-८३.१२ कोटी


4.मोफत वाटावयाच्या वस्तू ३४ हजार ६३४ नग -२.७९ कोटी


5.इतर- ८,७९,९१३ (नग) ३६.६२ कोटी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा