Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०२४

*माळशिरस तालुक्यातील अधिकाऱ्यांचा स्नेह मेळावा संपन्न*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

दिवाळी म्हटलं की गोडवा आला पण आहारात जसा गोडवा वाढतो तसा आपला विचारात ही गोडवा वाढविण्याचे गरजचे असते.त्यासाठी माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका माळशिरस व अकलूज यांच्या वतीने तालुक्यातील महाराष्ट्र व इतर राज्यात विविध ठिकाणी कार्यरत असलेले भूमिपुत्र तथा वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली तसेच आयपीएस अधिकारी संजय खरात यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील अधिकाऱ्यांचा स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच तालुक्यातील नूतन शासन सेवेत अधिकारी व कर्मचारी म्हणून निवड झाली आहे.त्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान सोहळा नुकताच माळशिरस येथे संपन्न झाला.      

       यावेळी तालुक्यातील उत्कृष्ट खेळाडू व पालक यांचा विशेष गुणगौरव सन्मान सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी संजय खरात (पोलीस अधीक्षक अहमदाबाद),धनंजय मगर (उपवन संरक्षक ओडिसा), संदीप कुंभार(सचिव केंद्रीय बाष्पक मंडळ भारत सरकार ),बाबासाहेब वाघमोडे (उपजिल्हाधिकारी),गणेश कचरे (अप्पर सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई),हरिश्चंद्र वाघमोडे (विभागीय वन अधिकारी सातारा),सुभाष साळवे(जिल्हा कृषी अधिकारी बीड),दिलीप पालवे (सेवानिवृत्ती कार्यकारी अभियंता),सोपान राजकर (न्यायाधीश),महेश ठवरे (न्यायाधीश),सचिन सूसलादे (सहायक सरकारी अधिवक्ता), संजय शिंदे (पी.आय.), बाळासाहेब माने (पी.आय.), अजय वगरे( जिल्हा मोहीम अधिकारी),आजिनाथ टेळे (नाबार्ड महा व्यवस्थापक), विजय वगरे (पोलीस निरीक्षक) प्रशांत शेंडे (टी ए ओ),राहुल माने,स्वप्निल तोरणे (एस डी ए ओ),जगन्नाथ गारोळे(महिला व बालकल्याण अध्यक्ष),गोरख बंडगर (सहाय्यक अभियंता जलसंपदा विभाग),अनिल माने(उपसंचालक भूमी अभिलेख),आप्पासाहेब समिंदर (सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी), सोमनाथ कर्णवर (एपीआय ), शरद खंडागळे(मंडळ अधिकारी),केशव तरंगे (सेवानिवृत्त नायब तहसीलदार), धनंजय पाटील (सेवानिवृत्त), गोविंद कर्णवर (शाखा अभियंता) सचिन पाटील (तलाठी),मल्हारी लोखंडे,राजेंद्र घुले (कृषी पर्यवेक्षक ),संभाजी वाघमोडे (सहाय्यक कृषी अधिकारी), राजू हुलगे(सहाय्यक कृषी अधिकारी), संदीप घुले (सहाय्यक कृषी अधिकारी),हनुमंत वगरे (ग्रामविकास अधिकारी),सागर मगर (एसीएफ ),माणिकराव म्हेत्रे (पोलीस हवालदार),सचिन गुडे (बी डी ओ),रणजीत रणवरे (पीएसआय),दयानंद वाघमोडे, नवनाथ गोरड (उप अभियंता जलसंपदा विभाग) या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते 

        या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिश्चंद्र वाघमोडे (विभागीय वन आयुक्त सातारा),आभार प्रदर्शन सोमनाथ कर्णवर पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा अध्यक्ष,माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान )यांनी केले तर सूत्रसंचालन शरद कर्णवर पाटील यांनी केले .


*चौकट*

पालकांनी लहानपणापासूनच आपल्या पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.दहावी बारावीनंतर पालकांनी पाल्याच्या त्यांच्या आवडी निवडीनुसार त्यांना शिक्षण द्यावे पालकांनी कोणती जबरदस्ती करू नका.मुलाच्या इच्छेनुसार शिक्षण द्या.नक्कीच तो पुढे यशस्वी होईल .

*संजय खरात*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा