चला मतदान करा
वय झालंय अठरा
शान तुम्ही या देशाची
नाव नोंद तुम्ही करा
चला मतदान करा
मना मनात रुजवा
लोकशाही अधिकार
योग्य बदल घडवा
चला मतदान करा
जाणा मताची किंमत
योग्य नेता निवडून
उन्नतीचा द्या हो मत
चला मतदान करा
कर्तव्य आपले बजवा
संविधानाने दिला हक्क
योग्य सरकार निवडा
अनिसा सिकंदर
ता.दौंड जि.पुणे
९२७००५५६६६





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा