Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०२४

*लक्ष -लक्ष दिव्यांनी उजळून निघाला मंदिराचा परिसर*


 

*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

अकलूज गावची ग्रामदैवत श्री अकलाई देवीच्या मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमानिमीत्त दिपोत्सोव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मंदिराचे विश्वस्त जयसिंह मोहिते-पाटील, त्यांच्या पत्नी सौ.सुलक्षणादेवी मोहिते-पाटील,कन्या कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील व सौ.ऋतुजादेवी संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर मंदिराच्या दिप माळेवर व परिसरात तेलाच्या वातीच्या पणत्या,मेणबत्ती,टेंभे असे हजारो दिवे प्रज्वलीत करण्यात आले.त्यामुळे मंदिराचा परिसर,दीपमाळा या हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा