Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०२४

महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटामध्ये अण्णासाहेब कोकाटे व शंभूराजे कोकाटे मित्र मंडळी यांच्या वतीने भव्य दिव्य मोटार सायकल रॅली


 *कार्यकारी संपादक 
- एस. बी. तांबोळी 

-टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 8378081147*

-----इंदापूर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटामध्ये अण्णासाहेब कोकाटे व शंभूराजे कोकाट मित्र मंडळी यांच्या वतीने भव्य दिव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली.

    विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून मतदारांना विविध प्रकारे रिजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानुसार पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अण्णासाहेब कोकाटे व शंभूराजे कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ४०० ते ५०० मोटारसायकलींची भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आली.



     बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील सराटी, पिंपरी बुद्रुक, गिरवी, नरसिंहपूर, गणेशवाडी, लाखेवाडी, बावडा आदि गावातून सदरची मोटरसायकल रॅली काढण्यात आली. सदर रॅलीत मोटारसायकलींना मोठं मोठे पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है यासह विविध प्रकारच्या घोषणा देण्यास आले. त्यामुळे परीसर घोषणामुळे दणाणून गेला. 



   गावोगावी रॅली पोहचताच पक्षाचे कार्यकर्ते व मतदार नागरिकांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. रॅली गावोगावी पोहोचताच वातावरण बदलून घड्याळ चिन्हांच्या घोषणा देवून आवाहन केले जात होते. जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी विविध प्रकारचे उपक्रम यशस्वी पणाने राबवून पुर्ण करण्यात आलेले आहेत.



     रॅलीचे आगमन बावडा गावी होताच सर्वांच्या नजरा त्याकडे आकर्षित झाले. बावडा येथे आयोजित सभेच्या ठिकाणी रॅलीचे आगमन होताच हलग्याच्या निनादात स्वागत करण्यात आले. त्यानंतर मोटरसायकल रॅलीतील तरुण युवकांनी दत्तामामा भरणे तुम आगे बढो अण्णासाहेब कोकाटे तुम आगे बढो अशा घोषणा देत सभास्थळी आगमन केले.



---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा