*संपादक--- हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448
आज दिनांक 16/ 11 /2024 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूरचे मुख्य बाजार आवारात तुळजापूर तालुका खरेदी विक्री संघ तुळजापूर व नाफेड मुंबई यांच्यामार्फत सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झालेल्या असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे
याप्रसंगी खरेदी विक्री संघ तुळजापूरचे चेअरमन सुनील जाधव सुधीर कदम .बाजार समितीचे व्यापारी संचालक बालाजी दादा रोचकरी. श्याम पवार. व मार्केटिंग फेडरेशन धाराशिव चे अधिकारी आबासाहेब मगर. बाजार समितीचे सचिव उमेश भोपळे .शेतकरी मकरंद लबडे. खुशाबा सूर्यवंशी. दिलीप गडदे .शेतकरी व हमाल बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यावेळी मार्केट फेडरेशन तालुका खरेदी विक्री संघ तुळजापूर व बाजार समिती तुळजापूर यांच्यातर्फे शेतकरी बांधवांना सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले व शेतकरी बांधवांना बांधवांना यांना आपल्या सोयाबीन हा शेतमाल वाढवून क्रीडा कचरा .विरहित स्वच्छ शेतमाल खरे केंद्रावर विक्रीसाठी आणावे असे आव्हान करण्यात आले शेतकरी यांना आपल्या सातबारा आधार कार्ड. बँक पासबुक. झेरॉक्स. इत्यादी आवश्यक कागदपत्रे घेऊन ऑनलाईन नोंदणी दिनांक 30 /11/ 2024 पर्यंत करून घ्यावी व शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा असे आव्हान चेअरमन सुनील जाधव यांनी केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा