*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
EVM मधील मतदाराचे प्रत्येकी 3 रे मत "भाजप काँग्रेस अथवा विशिष्ठ पक्षाला किंवा उमेदवाराला
मिळू शकते का ?? याचे उत्तर "होकारार्थी" आहे . अमेरिकेतील माधव अरविंद देशपांडे या सुप्रसिद्ध *
EVM तज्ञ आणि "विश्लेषक" आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे "सल्लागार" राहिलेल्या नामांकित व्यक्तीने हे मत नोंदवलेले आहे .
वास्तविक महाराष्ट्र कंगाल करून "हजारो कोटी" रुपयांचे उद्योगधंदे गुजरात ला नेऊन , मराठी अस्मितेचा अपमान करून मारून ,"गुजरात" मध्ये तयार केलेले EVM यंत्र महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात देऊन मतदारांना "फसविण्याचे षडयंत्र आज सुरु आहे.
भाजपाला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत 234 जागा मिळतात यावर महाराष्ट्रातील तसेच भारतातील मतदारांचा आजिबात "विश्वास" नाही. वास्तविक महायुती ला 47 जागा. मिळतील असा अंदाज असताना, जनतेचा प्रखर "विरोध" निकाल उलटे का लागले ???
जादूगारचा प्राण ज्याप्रमाणे पिंजऱ्यातील पोपट मध्ये असतो त्याप्रमाणे केंद्रसरकार मधील भाजपा चा प्राण "EVM मध्ये" तर नाही ना ???
EVM मध्ये प्रत्येकी "3 रे मत " एका ठराविक विशिष्ठ" पक्षाला मिळू शकते ??? होय ..! EVM मशीन मध्ये "हेराफेरी" होऊ शकते ?? होय ..! EVM मशीन हॅक होऊ शकतात का ?? .होय ..!
म्हणूनच बॅलेट पेपर" ही काळाची गरज बनली आहे.भारतातील सर्व निवडणुका बॅलेट पेपर वरच व्हायला हव्यात.
वास्तविक EVM मशीन हे 1977 चे एक मॉडेल आहे. अमेरिका पासून मोठया पाश्चिमात्य राष्ट्रांनी EVM ची सदोष "पारदर्शकता" आणि असुरक्षितते मुळे त्यांनी निवडणुकीत या EVM बॅन केले आहे. याचा "वापर" ते करत नाहीत.
् *EVM सेटिंग कसे करतात ???*
EVM मशीन मध्ये मतदान होते, त्यानंतर ते मत व्ही.व्ही.पॅट. मध्ये जाते आणि त्यानंतर प्रोग्रामिंग मशीन" मध्ये "डाटा" मध्ये जाऊन ते *
सेव्ह होते. खरा "खेळ" असा सुरु होतो ते पहा.
EVM मशीन निवडणुकीत उतरवण्याआधी जेथे ती "बनवली" जातात तेथे हेराफेरी होऊ शकते. विशेष म्हणजे ही EVM मशीन नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या गुजरात मध्ये बनवली आहेत हे विशेष ! भारतात याआधी ती दुसऱ्या राज्यात बनवल्या जात होत्या परंतु पण यांनी तो कारखाना जाणीवपूर्वक गुजरातला नेला गेला. हे सर्व "गोलमाल" नाही का ?? असो,
आता या मशीनमध्ये हेराफेरी कशी होऊ शकते ते पाहूया.
मी एक उदाहरण देत आहे. याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.समजा एका EVM मशीन मध्ये 800 मते आहेत. आपण असे समजूया की भाजपा ला आपला उमेदवार निवडून आणायचा असेल तर तो असे करू शकतो??? मतदाराने काँग्रेस ला मतदान केले . लाल लाईट लागले. बीप असा आवाज आला.त्यानंतर व्ही. व्ही. पॅट. मध्ये काँग्रेसच्या नावाचा कागद प्रिंट झाला. त्यानंतर आपण मतदान झाले हे समजतो.आणि आनंदाने "लोकशाहीचा" हक्क बजावला हे समजून मतदान केंद्रावरुन बाहेर जातो. महापालिका विधानसभा, आणि लोकसभा निवडणुकीत देखील असे कारस्थान झाले असेल आणि भविष्यात देखील होऊ शकते. आता सेटिंग कसे होते ते पहा...!
समजा एखाद्या "राजकीय" पक्षाला विशिष्ठ उमेदवार जिंकावा असे वाटतं असेल तर त्याची एक "ट्रिक" आहे. मतदान झालेल्या एकूण मतांपैकी 3% मते ही विशिष्ठ पक्षाला/उमेदवाराला जातील असा डाटा प्रोग्राम करण्याची EVM मध्ये सोय आहे. धक्का बसला ना ??? आता जागे व्हा.
उदाहरणार्थ समजा काँग्रेसचे पाटील हे उमेदवार आहेत. आणि भाजपचे गाडगीळ हे उमदेवार आहेत. जर EVM मध्ये घोटाळा करायचा असेल तर प्रोग्रॅमिंग डाटा मधील एकूण 800 मतांपैकी 3 % मते ही गाडगीळ या उमेदवाराला पडलेली असतात. म्हणजे 240 मते ही "ऑलरेडी" भाजपाला पडलेली असतात. ती कशी पडतात ते पाहूया.....
समजा गुजरात मधून मतदानासाठी EVM मशीन सांगली मतदारसंघासाठी किंवा दुसऱ्या शहरासाठी आणावयाची असतील, तर ती जिथे बनवली , तेथे सर्व मतदारांची नावे छापली जातात. वास्तविक तेथेच *
लोकशाहीचा गळा गोठण्याची खरी सुरवात होते. कारण तेथेच सर्व EVM सर्व मशीन मध्ये "सेटिंग" केली जाते.
आणि ठराविक पक्षाच्या उमेदवाराला 3% मते. जाणार असे प्रोग्राम EVM मध्ये फिक्स केले जाते. मतदारांनी काँग्रेसला/ राष्ट्रवादी अथवा शिवसेनेला किंवा दुसऱ्या पक्षाला /उमेदवाराला मतदान केले तरी दिसताना ते दिसते, परंतु डाटा मध्ये ते जातंच नाही.... म्हणजे डाटा "मोजताना" मतदारांनी दिलेले "मत" जातं नाही, ते मोजलेच जातं नाही. ही मतदाराची घोर फसवणूक नाही का ?? त्याशिवाय ज्या राजकीय पक्षाला /उमेदवाला जो मतदार आहे त्यांची मते त्यांना पडलेली असतातच. समजा एका मशीन मध्ये गाडगीळ यांना स्वतःची/पक्षाची 300 मते असतील तर 240+300 = 540 म्हणजेच गाडगीळ यांना "540 मते" मिळाली. अर्थात EVM मशीन मधील 800 मतांपैकी 540 म्हणजेच 60 % मते त्यांना व भाजपाला मिळाली. 60% किंवा 50% इतकी मते पडलेली आहेत.
महापालिका, विधानसभा, आणि लोकसभा निवडणुकीत देखील असे "कारस्थान" झाले असेल आणि "भविष्यात" देखील होऊ शकते.
आज डोळे उघडे ठेवून पहा. महाराष्ट्रात काही ठिकाणी अपक्ष उमेदवाराचे "स्वतःचे" मतदेखील त्याला पडले नाही.असे होऊ शकते का ??
EVM वर इतके आक्षेप
असतील तर संपूर्ण भारतात EVM वर बंदी घालायला हवी. व बॅलेटपेपर वरच निवडणुका व्हायला हव्यात. त्यासाठी मोठे जनआंदोलन उभे राहणे आवश्यक आहे. जे लोकशाही आणि "संविधान" जिवंत ठेवू शकेल. धन्यवाद !
*इकबाल बाबासाहेब मुल्ला*( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध,
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा