*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
तुळजापूर : तुळजाभवानी देवी मंदिराच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी मुंबई आणि लातूर येथील अधिकृत एजन्सी काम करणार आहे. पुरातत्त्व खात्याच्या निर्देशानुसार हे काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डाॅ. सचिन ओंबासे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी ओंबासे यांनी सांगितले की, मंदिर परिसराचा विकास मंदिर संस्थांच्या 56 काेटी निधीतून करण्यात येत आहे. कामाचे एकूण सहा टप्पे बनविण्यात आले आहेत. सहानी कन्स्ट्रक्शन मुंबई व साई कन्स्ट्रक्शन लातूर या दाेन कंपन्यांकडून हे काम केले जात आहे.
शासनाच्या नियमाप्रमाणे निविदा प्रसिद्ध करून कामकाज करण्यासाठी आदेश पारित केले आहेत. पहिल्या टप्प्यात भुयारी मार्ग आणि सभामंडपाचे जतन व संवर्धन करणे त्याचबराेबर नूतनीकरण केले जाईल. दुसèया टप्प्यात मंदिरातील उपदेवतांच्या मंदिरांचे जतन, संवर्धन व विकास केला जाईल. यात खंडाेबा मंदिर, मातंगी मंदिर, टाेळभैरव मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, मार्तंड ऋषी मंदिर, यमाई मंदिराचा समावेश करण्यात आला आहे.
तिसऱ्या टप्प्यात स्टेडियमच्या पायऱ्या तसेच गाेमुक्तीतीर्थ जवळ असणारे पूर्वीचे आराध्य खाेल्या व जुने प्रशासकीय कार्यालय या परिसराचा विकास करण्यासाठी इमारती काढून तेथे बाहेर पडण्याचा मार्ग विकसित करणे. मंदिर परिसरात असलेले अनावश्यक बांधकाम काढून टाकणे, दगडावर रासायनिक प्रक्रिया करून त्याची झीज हाेणार नाही, यासाठी काम करणे, जुन्या दगडावरील लेप काढून ते नवीन घडविल्यासारखे बनविणे, चाैथ्या टप्प्यात अभिषेक मंडपाचे नूतनीकरण करण्यात येईल. याला जाेडून असणारा तुकाेजी महाराजांचा मठ देखील विकसित हाेईल. हा परिसर संपूर्ण मंदिर परिसरात समाविष्ट केला जाईल.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा