*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रिडा संकुल म्हणजे लहान मुलांपासून अबालवृद्धांपर्यंत खेळण्याचे,फिरण्याचे व मन रमण्याचे एक प्रेक्षणीय ठिकाण झाले आहे.हे क्रिडा संकुल अकलूजच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे दररोज पहाटे व सायंकाळी या ठिकाणी लहानांपासून थोरांची सतत वर्दळ सुरू असते.मुले विविध खेळांचा सराव करायला येतात.महिला व पुरूष वर्ग फिरण्यासाठी येतात तर जेष्ठ नागरिक संसारातून थोडा वेळ काढून दररोज सायंकाळी रम्यमान वातावरणात जीवनातील खरा आनंद घेण्यासाठी येतात.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा