Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०२४

पत्रकार सुरेश (तात्या) मिसाळ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

 


*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी 

टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 8378081147*

-----इंदापूर शहरात राहणारे पत्रकार सुरेश (तात्या) मिसाळ यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सुरेश मिसाळ हे मागील २५ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी वार्ताहर म्हणून काम केले आहे.

    इंदापूर तालुक्याच्या विविध समस्या त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडल्या आहेत. मिसाळ यांची निर्भीड पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख होती.

सुरेश मिसाळ यांना काल (दि. ८) रोजी दुपारी ३.०० वाजता त्रास होऊ लागला. लगेच त्यांना तातडीने अकलूज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज (दि. ९) रोजी सकाळी ९.३० वाजता त्यांच्यावर इंदापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

       यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे तसेच युवानेते प्रवीण माने तसेच पत्रकार व हजारो नागरिक सुरेश मिसाळ यांना अखेरचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत उपस्थित होते.

पत्रकार सुरेश मिसाळ यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, तीन भाऊ, वहिनी व बहीण असा परिवार आहे.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा