Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३ नोव्हेंबर, २०२४

*भाऊबीज निमित्त "लाडक्या बहिणीचे भावाला" पत्र*


 

*करिष्मा- गावडे पाटील ,बारामती*


अरे माझ्या लाडक्या भाऊराया-

लोकसभेपासुन किती करशील,

दिडहजार देऊन माझ्यावर वरवर माया! 


अरे तुझ्या भाच्याच्या आणि दाजीच्या, 

संसाराची गेलीय रया! 


तुझा दाजी शेतात गाळतोय घाम-

पण त्याच उत्पन्न नाही ठाम! 


भाऊराया तुझा भाचा बेरोजगार घरात-

तू उद्योगांना दाखवला गुजरात! 

अरे मी पण राब-राब राबते-

मागे काय उरते? 


तुझे दिडहजार किती दिवस मिळणार? 

ते काय आम्हाला पुरणार? 


माझ्या मतासाठी तुझी चालु आहे गंमत-

भाऊराया नको रे करू, 

माझ्या मताची,गरिबीची किंमत! 


          *सोपानराव आटोळे*.*

             *खांडज-बारामती.* 

              *०३/११/२०२४.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा