*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
आमचे नेते उत्तमराव जानकर व मोहिते पाटील यांच्या युतीमुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकल्याने नुकतीच एक क्लीप व्हायरल करुन आमच्याबद्दल जनमत कलुषित करण्याचा विरोधकांचा डाव आहे. मात्र जरी ही क्लीप बनावट असली तरी उत्तमराव जानकर हे आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यानंतर कुठल्याही शक्तीला मागे पुढे न बघता भिडण्याचे काम करतात. त्यामुळे कुणी कितीही कांगावा केला तरी उत्तम जानकर हे कार्यकर्त्यांसाठी रस्त्यावर उतरणारे एकमेव नेते आहेत असे प्रतिपादन कट्टर जानकर समर्थक साजिदभाई सय्यद यांनी केले.
यावेळी पुढे बोलताना साजिदभाई सय्यद म्हणाले की, राजकारणात तडजोड होतच असते. माढा लोकसभा मतदारसंघापासून मोहिते पाटील व आम्ही एकत्र काम करायचे ठरवले आहे. मात्र आमच्या युतीमुळे दोन्ही डगरीवरचे राजकारण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दोन्ही शक्ती एकत्र आल्यामुळे विरोधक अशक्त झाले आहेत. त्यामुळे कशीतरी आमच्यात फूट पडावी या उद्देशाने क्लीप बनवून व्हायरल करण्यात आली आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांना आम्ही सहकार्य केले आहे, तर मोहिते पाटलांनी उत्तमराव जानकर यांना सहकार्य करायचे ठरवले आहे. मोहिते पाटलांचा प्रचाराचा झंझावात पाहून या प्रचाराला खीळ बसावी व मोहिते पाटील समर्थकांचे जनमत आमच्या विरोधात जावे यासाठीच हे सर्व षडयंत्र केलेले आहे. पण जरी ही क्लीप बनवलेली असली तरी एखाद्या कार्यकर्त्यावर कुठल्याही प्रस्थापित शक्तीने अन्याय केल्यावर उत्तमराव जानकर प्रशासनाबरोबरच रस्त्यावरची लढाई लढून कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. त्यामुळे उत्तमराव जानकर आमदार झाले तर कार्यकर्त्यांच्या केसालाही हात लावायची कुणाची हिंमत होणार नाही असे यावेळी बोलताना साजिदभाई सय्यद म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा