Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २६ डिसेंबर, २०२४

*अकलूज येथील डॉ.फैज राजमहमंद सय्यद यांना पुणे येथील" संत मदर तेरेसा रयत गौरव पुरस्कार 2024" प्रदान*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

अकलूज येथील डॉ. फैज राजमहमद सय्यद यांना पुणे येथील "रयत विद्यार्थी विचार मंच महाराष्ट्र राज्य" या संस्थेच्या वतीने दिला जाणारा  यंदाचा "संत मदर तेरेसा रयत गौरव पुरस्कार 2024 "नुकताच रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकाराम नगर -पिंपरी ,पुणे 18  येथे  आरोग्य क्षेत्रात आणि कमी वयात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अकलूजचे  परंतु (मूळगाव) चांदापुरी ता. माळशिरस जि. सोलापूर येथील डॉ.फैज सय्यद यांना हा पुरस्कार रयत विद्यार्थी विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे यांच्या हस्ते तर अतिरिक्त पोलीस महासंचालक महाराष्ट्र पोलीस फोर्स वन प्रमुख आयपीएस 'कृष्ण प्रकाश 'आणि रयत विद्यार्थी विचार मंचाचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करून सन्मानित करण्यात आले 

डॉक्टर फैज सय्यद यांच्या कर्तव्य मेडिकल फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या टीमने कुपोषणावर काम करत पुण्यातील काही शाळांमध्ये आरोग्य तपासणी करून मुलांना कुपोषणातून बाहेर पडण्यासाठी आर्थिक अपेक्षा न ठेवता मुलं चांगली शिकायचे असतील ,रोज शाळेत जायचे असतील त्यांच्या मेंदूची ताकद वाढवायची असेल तर या कुपोषित मुलांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे हे ध्येय उराशी बाळगून त्यांनी 20 पेक्षा अधिक शाळा आणि जवळजवळ 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून कमी वयात मोलाचे कार्य केले तसेच चार वृद्धाश्रम दोनशे वृद्ध रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणे अशाया कार्यात त्यांच्या अनेक मित्रां च्या सहकार्याने तब्बल चार महिन्यात इतका प्रवास पूर्ण केला  शिवाय कमी वयात जवळजवळ 50 डॉक्टरांची चांगली मजबूत फळी पुणे आणि आसपासच्या परिसरात त्यांनी उभी केली हे कार्य कौतुकास्पदच असून या कार्याची पोच  पावती म्हणून त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा