*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार केंद्र संघटन यांचे राज्यस्तरीय अधिवेशन रविवार दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी शिर्डी येथे संपन्न होणार आहे. राज्यातील महा-ई-सेवा केंद्र चालक व आधार केंद्र चालक यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी या राज्यव्यापी संघटनेची स्थापना करण्यात आली असुन . महा-ई-सेवा चालकांचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्याचा पाठपुरावा करून ते सोडवणे यासाठी संघटना प्रयत्न करणार आहे. शासनाने जनतेला एका रांगेत उभे न करता जागेवरच सर्व शासकीय प्रमाणपत्र देणे कामी महा-ई-सेवा केंद्र याची निर्मिती केली आहे. ही केंद्रे शासन व जनतेमधील दुवा म्हणून काम करत असून त्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते व या अडचणी सोडवण्यासाठी एकत्रितपणे लढा उभारणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने शिर्डी येथे प्रथम अधिवेशन घेण्याचे योजले आहे. त्यास राज्यातील सर्व महा-ई-सेवा चालक व आधार केंद्र चालक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य-- *रियाजभाई तांबोळी* यांनी केले आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा