*टाइम्स 45 न्यूज मराठी-- अकलूज*
अकलूज इंदिरा घरकुल येथे मारहाण केल्याचा अपमान सहन न झाल्याने फिर्यादीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अकलूज पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेली माहिती व फिर्यादीने दिलेली फिर्याद अशी की
मी राजश्री संजय खंडागळे वय 40 वर्ष धंदा घरकान राहणार इंदिरा घरकुल अकलूज तालुका माळशिरस सध्या जनरल वार्ड उप जिल्हा रुग्णालय अकलूज तालुका माळशिरस समक्ष विचारले वरून जबाब देते की
मी वरील ठिकाणी पति संजय असे दोघेच राहण्यास असून पती अकलाई घाट येथे चहाचा गाडा चालून त्यावर मिळणारे उत्पन्नावर आमचा घरप्रपंच चालवते.
काल दिनांक 06/12/2024 रोजी सकाळी 11.00 वाजण्याचे सुमारास, नी घरात एकटीच होते पती संजय हे कामावर आकलाई घाट येथे गेले होते. त्यावेळी आमचे शेजारी गल्लीमध्ये राहणारा योगेश संजय वाघमारे हा आमचे घरी आला व मला, मी त्याच्याकडून तीन महिन्यापूर्वी मुलगा महेश संजय खडागळे याचे उपचार करता ५० हजार रुपये घेतले होते त्या बदल्यात मला आता आठवडा साडेसात हजार रुपये प्रमाणे पैसे पाहिजेत असे म्हणाला त्यावेळी मी योगेश वाघमारे याला मी तुला पैसे दिले आहेत सध्या आमची परिस्थती ठीक नाही असे म्हणाले, त्यावर योगेश वाघमारे यांनी त्याची आई रेश्मा संजय वाघमारे आजी भामाबाई पाडोळे, त्याची बायको सुकन, योगेश वाघमारे बालाजी दत्तात्रेय पाटोळे यांना बोलावून घेऊन ते आल्यावर त्यांनी तू आमचे पैसे का देत नाही म्हणून सर्वांनी मिळून हाताने लता भक्क्याने मारहाण करू लागले त्यावेळी माझे ओरडण्याचे आवाजाने शेजारी राहणाऱ्या हिराबाई वाघमारे सुमनबाई मोरे यांनी मला त्यांच्यापासून सोडवले त्यानंतर मी माझे घरात जाऊन पती संजय खंडागळे यांना फोन करून सर्व प्रकार सांगितला व मी घराचे दार लावून पाच ते दहा मिनिट विचार केला त्यानंतर साडी घेऊन मी पत्र्याचे अडूला बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पती संजय हे आले व त्यांनी दरवाजा वाजवला मी दरवाजा उघडत नसल्यामुळे त्यांनी पत्र्याचे खालून हात घालून कढी काढली व दार उघडल्यानंतर अति संजय यांनी मला पाहताच मला धरून मी घेतलेला फास सोडवला व शेजारी राहणारे गवळी यांचे रिक्षा मधून मला सरकारी दवाखाना अकलूज येथे आणून उपचारास दाखल केले तसेच मी त्यावेळी घराचे दार लावून घेतले त्यावेळी लगेच वरील सर्वांनी जातेवेळी मला शिवीगाळ करून तू पैसे दिले नाहीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून माझी नमूद वरील सर्वांच्या विरुद्ध तक्रार आहे
माझा वरील जवाब माझे सांगणे प्रमाणे बरोबर लिहिला असून तो मला शंकर बबन काळे यांनी वाचून दाखवला अशा आशियाची फिर्याद दाखल झाली असून भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे 189 (2) 190 191(2) 115 (2) 352 351(2) 351 (3) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे करत आहेत.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा