Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ८ डिसेंबर, २०२४

*पुणे शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक तीन ची कामगिरी* *विधीसंघर्षित बालकाकडून १ अग्निशस्त्र व १ जिवंत काडतुस हस्तगत तसेच २ आरोपीकडून १ घरफोडीचा गुन्हा उघडकीस*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

दि. ०६/१२/२०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबडेकर महापरिवर्तन दिनाच्या अंनुशंगाने गुन्हे शाखा युनिट ३ मधील अधिकारी व स्टाफ असे रेकॉडवरील गुन्हेगार चेकिंग व लॉज चेकीग व अवैध्य धंदयावर कारवाई करण्याकरिता गस्त करित असताना पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते यांना मिळाले बातमीवरुन विधीसंघर्षीत बालक यांस पकडुन त्याचेकडुन कि. रु.४०५००/- चे देशी बनावटीचे लोखंडी पिस्तल व एक पितळी काडतुस मिळुन आले आहे.


नमुद विधीसंघर्षीत बालकाकडे तपास करता सदरचे पिस्टल हे त्याने त्याचा साथीदार याचेकडुन घेतले असल्याचे सांगितले आहे. सदरचे पिस्टल हे त्यांनी मध्यप्रदेश येथून आणले असल्याचे सांगीतले आहे. नमुद विधीसंघर्षीत बालकाविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाणे, उत्तमनगर पोलीस ठाणे येथे दरोडा, दरोडयाचा प्रयत्न व अग्निशस्त्र बाळगल्यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी याचा पोलीसांकडुन शोध सुरु आहे. नमुद विधीसंघर्षीत बालकाकडे अग्निशस्त्राबाबत सिहंगड रोड पोलीस ठाणे गु.र. नं ७२३/२०२४ भारतीय शस्त्र अधि कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७ (१) सह १३५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, युनीट ३, गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत.



तसेच सिंहगड रोड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ५५६/२०२४ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०५, ३३१ (३), ३३१ (४) या गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना पोलीस हवा. संजीव कळंबे यांनी तांत्रिक विश्लेषण करून दाखल गुन्हयातील चोरीस गेला मोबाईल हॅन्डसेट मनोज आनंदा गायकवाड, वय २२ वर्षे, रा. हरगुडे निवास, तिसरा मजला, सणसवाडी, पुणे मुळ रा. मु. पो. नंदगाव, ता. मुखेड, जि. नांदेड हा वापरत असल्याची माहिती मिळाली. त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे केले तपासात त्याने व त्याचे साथीदार दिपक टिका विश्वकर्मा वय २० वर्षे, रा. साईपार्क सोसा. स. नं.१४, तुकाराम नगर, पुणे व राजु बहादुर रा. गाडीतळ, हडपसर, पुणे यांनी मिळून सदरची घरफोडी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी नामे मनोज आनंदा गायकवाड याचेकडून दाखल गुन्हयातील १०,०००/- रूचा एक मोबाईल हॅन्डसेट जप्त करण्यात आलेला आहे. तसेच आरोपी नामे मनोज आनंदा गायकवाड व दिपक टिका विश्वकर्मा यांना पुढिल कारवाईकामी सिंहगड रोड पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे. तसेच पाहिजे आरोपी राजु बहादुर रा. गाडीतळ, हडपसर, पुणे याचा शोध सुरू आहे.


सदरची कारवाई ही मा. श्री शैलेश बलकवडे सोो, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, मा. श्री निखिल पिंगळे सो, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा पुणे शहर, मा. श्री. गणेश इंगळे सो, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर यांचे मार्गदर्शनखाली रंगराव पवार वरिष्ठ पोलीस निरिक्षक, युनिट ३ गुन्हे शाखा, पुणे शहर, सहा. पो. निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उप-निरीक्षक राजेंद्र पाटोळे, पो.हवा. शरद वाकसे, गणेश सुतार, विनोद भंडलकर, सुजित पवार, संजीव कळंबे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते, प्रतिक मोरे, राकेश टेकावडे, हरिश गायकवाड, इसाक पठाण व महिला पोलीस हवा. सोनम नेवसे यांनी कामगिरी केलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा