Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ११ डिसेंबर, २०२४

*शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाचे नेते व माजी आमदार अनिल गोटे यांचा भाजपाला इशारा*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

 भाजपवाल्यांनो, श्रीलंका, बांग्लादेश, सिरीया लांब नाही, असेच धंदे चालू ठेवले तर, तुमचा नंबर लागायला उशिर लागणार नाही. आता तरी सुधरा..!


• रावणाला दहा तोंडे होती, त्याचा गर्व शिगेला पोहोचला नाही. तो टिकला नाही, तुम्हाला तर एकच तोंड आहे !


लोकभावनेच्या विरुद्ध फार काळ तुम्ही राज्य करु शकत नाही, हे मागिल ४ वर्षात अनेक राष्ट्रामधील सत्ता सामान्य जनतेने उलथवून टाकली यावरून दिसून आले आहे.


श्रीमती इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करुन, बांग्लादेशाची निर्मिती केली, पण बांग्लादेशचे निर्माते आणि तत्कालीन अध्यक्ष शेख मुजबुरहेमान यांना त्यांच्याच निवासस्थानात सहकुटूंब, सहपरिवार क्रांतीकारकांनी अक्षरशः गोळ्या घालून ठार मारले.


प्रथम बांग्लादेशात शेख मुजबुरहेमान यांनी आणीबाणी आणली, नंतर आपल्या देशात श्रीमती इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणली. त्यावेळेस राजकीय निरीक्षक म्हणत की, बांग्लादेश श्रीमती इंदिरा गांधीची प्रयोगशाळा आहे.


भाजपवाल्यांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की, लोकांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका! महाराष्ट्र आणि मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. भाजपाला कुठल्याही परिस्थितीत ही आर्थिक राजधानी आपल्या अधिपत्याखाली असली पाहीजे हा हट्ट आहे. त्या हट्टाची पुर्तता करण्यासाठी तुम्ही अख्या महाराष्ट्राचे वाटोळे केले.

तुम्ही सर्वोच्च न्यायालयात टाईपास कराल, पण जनतेवर राज्य करण इतक सहज नाही. महाराष्ट्रातील राज्य सरकार हे जनतेच्या मनाच सरकार नाही. हे यंत्रातून जन्माला आलेले सरकार आहे. याबद्दल सामान्य माणसाच्या मनात काहीही शंका नाही. म्हणूनच वांद्यापासून चांद्यापर्यंत मतदान यंत्राविरुद्ध हा असंतोष हळू- हळू व्यक्त होत आहे. तुम्ही त्या असंतोषाला खतपाणी घालीत आहात. मरकडवाडी येथे स्थानिक लोक मतदान पत्रिकेवर मतदान घेत होते. त्यावर तुम्ही मार्शल लॉ लावल्यासारखे त्या गावकऱ्यांना मतदान पत्रिकेवरील मतदान करू दिले नाही ही तुमच्या अधःपतनाची सुरुवात आहे.


मा. सर्वोच्च न्यायालयाने मतदान झालेल्या व्हीव्हीपॅट मशीन मधील ५ टक्के चिठ्ठ्या मोजण्याचे आदेश दिले होते. तुम्ही मात्र व्हीव्हीपॅट क्लिअर करुन, त्यावर मतदानाची प्रक्रिया करुन दाखविण्याचे धोरण ठेवून दिशाभूल करीत आहात, त्यामुळे यंत्राद्वारे झालेल्या मतदानाबाबत व्यक्त केलेला संशय कसा उघडकीस येणार ? जनतेला एवढे मुर्ख समजू नका ! ये पब्लीक है। ये सब जाणती है।


विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात जावे, तेथे चालढकल करुन ५ वर्ष सुखनैव राज्य कराव हे तुमचे कावेबाज राजकारण आणि कारस्थान जनतेच्या लक्षात आले आहे. नसेल आले तर आम्ही लक्षात आणून देवूच, याची जाणीव ठेवा !


बांग्लादेश, श्रीलंका, सिरीया इत्यादी देशाची राजसत्ता सामान्य जनतेने उलथवून टाकली आहे. मी तुम्हाला एवढेच सांगतो, 'बकरेकी मा कब तक दुवा मांगेगी' ? आता देशातील जनता बंड करून उठल्याशिवायर राहणार नाही ह्याची नोंद घ्यावी.


रावणाला दहा तोंडे होती, त्याचा गर्व शिगेला पोहोचला होता. तो टिकला नाही, तुम्हाला तर एकच तोंड आहे हे विसरु नका !


असे इशारा देणारे पत्रक शिवसेना नेते, माजी आमदार, कार्यसम्राट अनिल अण्णा गोटे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.





(अविनाश लोकरे) प्रसिद्धी प्रमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा