Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २६ डिसेंबर, २०२४

*कॅन्सरची मगर मिठी कुटुंब उध्वस्त करत आहे -मृत कुटुंबाचा "आक्रोश" सरकारला कधी कळणार?--इक्बाल बाबासाहेब मुल्ला*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448*

कॅन्सरने  मृत्यू पावलेल्या घरातील लहान मुले आईला बिलगून - रडत विचारतात आई , अमेरिकेत कॅन्सरचा पेशन्ट बरा होतो मग माझ्या पप्पाना देवाने का बोलावले ???  त्यांचा काय दोष ?? भारतातून श्रीमंत* अमेरिकेत जाऊन "बरे" होतात मग भारतामध्ये ते औषध का नाही ??? आईचा  पोटचा गोळा 

हिरावलेल्या आईला, कपाळावरील कुंकू* पुसलेल्या व  "विधवा" झालेल्या त्या पत्नीला आणि काहीही कारण नसताना स्वार्थी जगात आधारस्तंभ हिरावलेल्या आणि डोक्यावरील मायेचा "हात" नियतीने  "छाटलेल्या " त्या मुलांना विचारा "दुःख" काय असते ??? मृत्यू  काय असतो ??? आणि "वेदना" काय असतात ??? 



वाचकहो, कॅन्सरने मृत्यू पावलेल्या एका घरात "आईला" बिलगलेल्या एका लहान मुलीचे हें वाक्य हृदयाला  "पाझर" फोडते, "अश्रूंचा  बांध फोडते आणि आधुनिक भारताचे "गाजर" दाखवणाऱ्या मोदी सरकारला वास्तवतेचा "आरसा" दाखवते ,अंजन दाखवते. कारण भारताला  तथाकथित "कर्जाच्या" खाईत उभे करणारे, रिझर्व्ह बँकेचे अब्जावधी रुपये घेऊन आणि ब्रिटन मधील हजारो टन सोने  आणणारे मोदी सरकार भारतातील गरीब /मध्यमवर्गीय जनतेसाठी त्यांच्या "आरोग्यासाठी" भयानक असणाऱ्या कॅन्सरग्रस्त पीडितांसाठी कोणतेही "नियोजन" करायला तयार नाही की अमेरिकेमधून औषध आयात करायला तयार नाही.



करोडो रुपये खर्च करून मंगळ ग्रहावर भारत आकाशात  "यान " सोडते ,परंतु भारतात कॅन्सरचा इलाज नसताना ,दरवर्षी "हजारो लोक" आपला जीव तडफडत सोडताना भारत सरकारला "वेळ" नाही. 

आज दुर्दैवाने "लोकशाही" संकटात आहे, बॅलेट पेपर  वर निवडणुका न होण्यासाठी ,विद्यमान सरकारे "पाडण्यासाठी" केंद्राला वेळ असतो परंतु कॅन्सर सारख्या भयानक आजारांवरील औषध आण्यासाठी सरकारला अजिबात "सवड" नाही.

.दुर्दैवी बाब ही की  आज तंबाखू -मावा -गुटखा याच्या जाहिराती टीव्ही- चित्रपटगृहात - झळकत असताना मेलेल्या माणसावर देखील सरकार GST आकारत आहे .किती किळसवाणा आणि संतापजनक प्रकार आहे हा ???

कॅन्सरची मगरमिठी कुटुंब उध्वस्त करत आहे. मृत फॅमिलीचा "आक्रोश" सरकारला  कधी कळणार ?? उघडा पडलेला "संसार" आणि "विस्कटलेल्या" मनाच्या व्यथा सरकारला केंव्हा कळणार ?? उध्वस्त झालेला संसार आणि त्याच्या पाऊलखुणा कर्ता पुरुष मेल्यानंतर "लुप्त" होतात. या स्वार्थी आणि भयानक जगात या  कुटुंबियांना आपुलकी  कोण  दाखवणार ?? ते

भारत सरकारने तात्काळ भारतातील जनतेसाठी पाश्चिमात्य  देशांकडून कॅन्सरच्या "इलाजासाठी" औषध आणून भविष्यातील हजारो मृत्यू  थांबवावेत, कुटुंबियांचे "आशीर्वाद" घ्यावेत ही विनंती ! 


आ. *इकबाल  बाबासाहेब  मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली 

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा